औरंगाबाद -विद्यापीठात विभागांनी ज्या प्रकारचे काम करायला हवे ते केले नाही. विभागप्रमुख, प्राध्यापकांत राजकारण, संशोधनात बाधा आणण्याचे कितीतरी प्रकार मी स्वतः अनुभवलेले आहे. विद्यापीठात निर्मळ स्वच्छ वातावरण निर्माण झाले. तरच ज्ञानात्मक प्रगती होवू शकते. प्राध्यापक हे उत्तम दर्जाचे संशोधक हवे. कुलगुरूंना वैयक्तिक संशोधनला स्थान, सवडीची व्यवस्था निर्माण झाल्यास विद्यापीठ आहे त्या पेक्षा अधिक चांगले संशोधन कार्य करू शकेल असे ज्येष्ठ समिक्षक डाॅ. सुधीर रसाळ म्हणाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त जीवन साधना पुरस्कार साहित्यिक ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते गाैरवण्यात आले. या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. विद्यापीठ स्थापनेपासूनच्या आठवणींना उजाळा देत त्यावेळी असलेल्या घरघुती वातावरणाची आठवण करून देत पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे आभार मानले. शिक्षणातील गुणवत्ता राखणे एकट्या विद्यापीठ किंवा कुलगुरूंची जबाबदारी नाही. प्राध्यापकांनीही हक्क मागतांना जबाबदारीची जाणीव ठेवली पाहीजे. तसेच सलग्नीत महाविद्यालयात आवश्यक भौतीक सुविधा, प्राचार्य, अध्यापक असावेत. नुसती पदवी देवून चालणार नाही. अशा पद्धतीच्या शिक्षणाने पुर्ण पिढी बरबाद करत आहोत. याकडे गंभीरतेने पहा. असे म्हणत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाच्या ६४ व्या वर्धापनदिनी संशोधन, शैक्षणिक, प्रशासकीय भरीव वाटचालीचा मनोदय कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी अध्यक्षीय समोरोपात व्यक्त केला.
प्रास्ताविक प्र. कुलगुरू डाॅ. श्याम शिरसाठ यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. पुरूषोत्तम देशमुख, मानपत्राचे वाचन प्रा. दासू वैद्य यांनी केले. यावेळी बालसाहित्यिक बाबा भांड, ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापुरकर, प्रा. डॉ. विलास खंदारे, किशोर शितोळे, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, डॉ. संजय सांभाळकर यांची उपस्थिती होती. यावेळी गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सत्कार कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला.
रसाळ शिक्षकपण जिवंत ठेवणारे प्राध्यापककुलगुरू डाॅ. येवले म्हणाले, सुधीर रसाळ हे शिक्षकपण जिवंत ठेवणारे ते प्राध्यापक होते. विद्यापीठ जडणघडणीचे ते साक्षीदार राहीले. इथली राजकीय शक्ती प्रबळ असल्याने विद्यापीठ स्थापन झाले. नऊ महाविद्यालयांचे ३ हजार विद्यार्थ्यांचे विद्यापीठ आज ४८० महाविद्यालय, ५२ विभागांपर्यंत विस्तारलेल्या विद्यापीठात साडेचार लाख विद्यार्थी शिकत आहे. संख्यात्मक वाढ होतांना गुणात्मक वाढ खुंटते. चौकटीत काम करतांना गुणवत्ता वाढीकडे लक्ष देत आहोत. एकलकोंडा झालेला विद्यार्थ्याला या गर्देतून सोडवण्याचे आव्हान असल्याचे कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले.
साधनेत आनंद आणि समाधान : बाबा भांडसाधनेला वैचारिक जोड हवी असते ती सुधीर रसाळ सरांनी दिली. ते मराठीची गंगोत्री आहे. अलीकडच्या काळात लोक सत्ता संपत्तीत अडकत आहे. आनंद आणि समाधान हे आवडीच्या साधनेत मिळू शकते. त्याचा होणारा सन्मान प्रेरणा देणारा असतो. राज्य शासनाने उच्च शिक्षण विभागाने युगपुरुषांचे साहित्य खरेदी करावे. युगपुरूषांचे साहित्य अस्तीरतेच्या काळात मानसिक स्वास्थ्य देईल. असे बाल साहित्यिक बाबा भांड म्हणाले.
लवकरच ऑन स्क्रिन व्हॅल्यूएशनअंबेजोगाई येथे २५ एकर, जालन्यात १० एकर विद्यापीठाला मिळालेल्या जागेवर कौशल्य विकासाचे केंद्र उभारणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा लवकरच आयोजीत करू. विद्यापीठ गेटच्या परीसरात सौदर्यीकरण, नामांतर शहिद स्मारक, परीक्षा विभागाच्या दुसऱ्या मजल्याचे विस्तारीकरण करत आहोत. तिथे ऑन स्क्रिन व्हॅल्यूएशन सुरू करायचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रासाठी २५ कोटींचा निधी मिळण्याची अपेक्षा असल्याचे कुलगुरू डाॅ. येवले यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले.