औरंगाबाद : कचनेर येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील हॉकी स्पर्धेत कोल्हापूर व क्रीडा प्रबोधिनीने मुलांच्या गटात अंतिम फेरीत धडक मारली. मुलींच्या गटात कोल्हापूर आणि नागपूरने फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला.मुलांच्या गटातील उपांत्य फेरीत कोल्हापूरने नागपूरचा २-0 गोलने पराभव केला. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला अजय कदम याने गोल करीत नागपूरच्या गोलचे खाते उघडले आणि २३ व्या मिनिटाला दीपक कदमने गोल करीत नागपूरची आघाडी दुप्पट केली व ती अखेरपर्यंत कायम राहिली. दुसºया उपांत्य फेरीत क्रीडा प्रबोधिनीने टायब्रेकरमध्ये मुंबई संघावर ३-0 गोलने मात करीत अंतिम फेरी गाठली. क्रीडा प्रबोधिनीकडून रोहन पाटील, शिवकुमार व प्रज्वल मोहारकर यांनी गोल केले. त्याचप्रमाणे गोलरक्षक जीवन शिंदे याने तिन्ही गोल अडवताना संघाच्या विजयात निर्णायक योगदान दिले.मुलींच्या गटातील उपांत्य फेरीत नागपूने औरंगाबादवर २-0 असा विजय मिळवला. नागपूरकडून निकिता जांभूळकरने १७ व्या मिनिटाला तर ४७ व्या मिनिटाला कांचन खेताडे हिने गोल केला. दुसºया उपांत्य फेरीत कोल्हापूरने पुणे संघावर २-१ अशी मात केली. कोल्हापूरकडून श्रेया पिसे व श्रुती आघाव यांनी गोल केले. पराभूत संघाकडून स्नेहल शिवांतने गोल केला.
कोल्हापूर, क्रीडा प्रबोधिनी, नागपूर अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:49 AM