शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

कोल्हापुरी बंधारे कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:40 AM

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. बहुतांशी कोल्हापुरी बंधारेही अजून कोरडेच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. बहुतांशी कोल्हापुरी बंधारेही अजून कोरडेच आहेत. वास्तविक वाहते पाणी असताना साधारणपणे आॅक्टोबर महिन्यात कोल्हापुरी बंधाºयांमध्ये पाणी अडवले जाते; पण यंदाची परिस्थिती बघता सप्टेंबर महिन्यातच काही बंधाºयांचे गेट टाकून पाणी अडवण्यासाठी जिल्हा परिषदेचा सिंचन विभाग सज्ज झाला आहे.जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फ त शेतीची सिंचन क्षमता वाढावी यासाठी गरजेनुसार कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये ५८५ कोल्हापुरी बंधारे पाणी अडविण्यासाठी उपयुक्त आहेत; मात्र कधी अतिवृष्टीमध्ये गेट वाहून गेले, तर कधी शेतकरी किंवा पाणी वाटप संस्थांच्या दुर्लक्षामुळे अनेक बंधाºयांचे गेट चोरीला गेले आहेत. ५८५ बंधाºयांसाठी साधारणपणे २५ हजार ३३२ दरवाजांची गरज आहे. यापैकी सध्या १८ हजार ७१४ दरवाजे उपलब्ध असून, ६ हजार ६१८ दरवाजांची गरज आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे जिल्हा परिषदेने उपकरातून कोल्हापुरी बंधाºयांच्या गेटसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद केली होती.प्रशासनाने मे २०१६ पासून दरवाजे खरेदीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी ई-निविदा काढण्यात आली; पण त्याला प्रतिसादच मिळाला नाही. तीन वेळा फेरनिविदा काढूनही गेटसाठी कंत्राटदार पुढे आले नाहीत.गेट खरेदी आणि बंधारे निवडीवरून सदस्यांनी अनेक सर्वसाधारण सभांमध्ये मुद्दे उपस्थित केले; पण ठोस कारवाई मात्र होऊ शकली नाही. मागील तीन महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवली. तेव्हा एक पुरवठादार संस्था पुढे आली. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत दरास मान्यता घेण्यासाठी गेट खरेदीचा प्रस्ताव चर्चेला आला; मात्र त्यावर निर्णय होऊ शकलानाही.निविदा प्रक्रियेनुसार अडीच कोटी रुपयांच्या निधीतून ३ हजार ३८ गेट खरेदी केले जाणार असले तरीही बंधाºयांसाठी आणखी ३ हजार ५८० गेट कमीच पडणार आहेत.