लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील कोठा कोळी येथे स्वाईन फ्लूचा रूग्ण आढळून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी आरोग्या विभागाच्या तीन सदस्यीय पथकाने गावात घरोघर जाऊन तपासणी केली. यापैकी दोन जणांना ताप व सर्दी आढळून आली. मात्र घाबरण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.कोठा कोळी येथील एका ६० वर्षीय रूग्णाला स्वाईन फ्लू झाल्याचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. ग्रामस्थांमध्ये स्वाईन फ्लूची काही लक्षण अथवा काही त्रास असल्यास याचे निदान व्हावे म्हणून आरोग्य विभागाकडून विशेष दक्षात घेण्यात येते आहे. कोठाकोळीसाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पथक प्रत्येक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना तसेच औषधी वाटप करीत आहे. आरोग्य विभागाचे सतीश निकम, आरोग्य सेवक माधव हिरेकर, परिचारिका शांताबाई झिल्पे यांनी यांनी गावात जाऊन तिसऱ्या दिवशी ४० पेक्षा अधिक रूग्णांची तपासणी केली.
कोठाकोळीत आरोग्य पथक तळ ठोकून..!
By admin | Published: May 08, 2017 12:13 AM