शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

क्रांती चौक पोस्ट ऑफिस ढूँढते रह जाओगे...; ४० वर्षानंतर स्थलांतर, तेही तात्पुरते

By प्रशांत तेलवाडकर | Published: February 01, 2024 6:42 PM

क्रांती चौक पोस्ट ऑफिस मागील ४० वर्ष जालना रोडवरील कुशलनगरात एका बंगल्यात खालील बाजूस होते.

छत्रपती संभाजीनगर : सिडकोनंतर सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहराचा अर्धा दक्षिण भाग क्रांती चौक पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत येतो. ४० वर्षांनंतर या पोस्ट ऑफिसला कोणी ‘जागा देत का जागा’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे... जालना रोडवरील जागा खाली करावी लागल्याने आता हे ऑफिस आता थेट बसस्टँड रोडवर गेले आहे... पोस्ट ऑफिसचा शोध घेताना नागरिकांना दमछाक होत आहे. त्यामुळे थट्टेमध्ये नागरिक म्हणत आहेत ‘क्रांती चौक पोस्ट ऑफिस ढूँढते रह जाओगे’...

४० वर्षांनंतर दुसऱ्या जागेचा शोध...क्रांती चौक पोस्ट ऑफिस मागील ४० वर्ष जालना रोडवरील कुशलनगरात एका बंगल्यात खालील बाजूस होते. ही भाड्याची जागा होती. मालकाने दिलेला नोटीस पिरीयड संपला आणि अखेर पोस्ट ऑफिसलाही जागा खाली करावी लागली. विशेष म्हणजे नोटीस पिरीयड काळात दुसरी जागा शोधण्यात अपयश आले. अखेरीस क्रांती चौक पोस्ट ऑफिस मध्यवर्ती बसस्थानक रोडवरील एम्प्लाॅयमेंटच्या समोरील बाजूस भाग्यनगरात पोस्ट ॲण्ड टेलिग्राफ काॅलनीत टू बीएचके जागेत स्थलांतर करावे लागले.

या पोस्ट ऑफिसच्याअंतर्गत शहराचा किती भागक्रांती चौक पोस्ट ऑफिसचा अंतर्गत महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) ची दक्षिण बाजू ‘आरोग्य संचालनालय’ ते रेल्वे स्टेशन. महावीर चौक ते सेव्हन हिल चौक, सेव्हन हिल चौक ते चाणक्यपुरी. शहानुरमियाँ दर्गा ते रेल्वे स्टेशन एवढा मोठा परिसर येतो. सिडको पोस्ट ऑफिसनंतर सर्वांत मोठा भाग याच पोस्ट ऑफिसशी जोडला गेला आहे. २० पोस्टमन येथे सेवा देत आहे.

पोस्टाचे बजेटमध्ये जागा मिळेनापोस्ट ऑफिससाठी केंद्र सरकारने भाड्याचे दर ठरवून दिलेले आहे. कुशलनगरमध्ये १७ हजार रुपये भाडे दिले जात होते. मात्र, आता या भाड्यात पोस्टाला जागा मिळत नाही. यामुळे ‘कोणी जागा देत का जागा’ म्हणण्याची वेळ पोस्टावर आली आहे.

कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे लोकांचा संतापकुशलनगरपासून २ कि. मी. अंतरावर भाग्यनगरात पोस्ट ऑफिस स्थलांतरीत झाले आहे तसेच भाग्यनगरात हे ऑफिस शोधताना लोकांची दमछाक होत आहे. त्यामुळे नागरिक आपला संताप कर्मचाऱ्यांवर व्यक्त करत आहेत.

नवीन जागा मिळेपर्यंत तात्पुरती व्यवस्थाक्रांती चौक पोस्ट ऑफिस स्थलांतरित करण्यात आले आहे. पण ही तात्पुरती व्यवस्था आहे. आम्हाला ४ ठिकाणच्या जागेचे प्रस्ताव आले आहेत. तो प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविला आहे. तिथून तो मुख्य पोस्ट मास्तर जनरल (मुंबई) या ऑफिसला जाईल. तिथील समिती जागा बघण्यासाठी शहरात येईल व केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्या बजेटमध्ये बसेल त्याठिकाणी भाडे करारावर ऑफिस स्थलांतरीत करण्यात येईल.-जी.हरिप्रसाद, प्रवर डाक अधीक्षक

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसAurangabadऔरंगाबाद