शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
5
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
6
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
7
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
8
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
9
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
10
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
11
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
12
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
13
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
14
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
15
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
16
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
17
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
18
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
19
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
20
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी

मजुरांच्या घामाची कवडीमोल किंमत !

By admin | Published: October 26, 2014 11:37 PM

संजय तिपाले , बीड वादळवारे, ऊन- पावसाचे वार झेलत रात्री- अपरात्रीही कष्टाशी इमान राखत झुंजणाऱ्या ऊसतोड मजुरांना पुरेशी मजुरीही मिळत नाही.

संजय तिपाले , बीडवादळवारे, ऊन- पावसाचे वार झेलत रात्री- अपरात्रीही कष्टाशी इमान राखत झुंजणाऱ्या ऊसतोड मजुरांना पुरेशी मजुरीही मिळत नाही. ऊसतोडणीसाठी विकसीत झालेल्या हार्व्हेस्टरला टनामागे पाचशे रुपये मोजले जातात;परंतु हेच काम मजुरांनी केले तर हातावर केवळ १९० रुपये टेकवून त्यांची बोळवण केली जाते. त्यामुळे कामगारांच्या आर्थिक उन्नतेची चाके अनेक वर्षांपासून फडातच रुतलेली आहेत.शेती हेच प्रमुख साधन असलेल्या बीडमध्ये उद्योगांचा अभाव आहे. त्यामुळे बेभरवशाच्या शेतीवर संपूर्ण कुटुंबाची गुजराण शक्य होत नाही. उचल घ्यायची अन् बिऱ्हाडासह सहा महिन्यांकरता रोजगारासाठी स्थलांतर करायचे... हा इथल्या सहा लाख लोकांचा ठरलेला कार्यक्रम.जगण्याचा संघर्ष काय असतो? याचे उत्तर ऊसतोड मजुरांकडे पाहिल्यावर मिळते. ऊस तोडण्यापासून ते मोळ्या बांधण्यापर्यंत अन् डोक्यावर मोळ्या घेऊन वाहनात ढकलेपर्यंत या कामगारांना अतिशय जोखमीची व कष्टाची कामे करावी लागतात. त्यांच्या कष्टाची योग्य किंमत व्हावी, ही साधी अपेक्षाही अनेक वर्षांपासून पूर्ण होत नाही. पिढ्यान्पिढ्या कोयत्याशी नाते सांगत जगणारे बीडमधील कामगार आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, तामिळनाडू या राज्यातील शिवारांमध्ये घामाच्या धारा वाहत आहेत;परंतु कष्टाचे मोल काही झालेच नाही. हा तर मजुरांचा हक्कहार्व्हेस्टरमुळे ऊसतोड मजुरांचा रोजगार हिरावला जाईल, अशी भीती होती अन् झालेही तसेच. हार्व्हेस्टरच्या तोडणीला एक टनामागे ५०० रुपयेइतकी मजुरी मिळते;परंतु मजुरांना मात्र केवळ १९० रुपये दिले जातात. ऊसतोडणीच्या कामातही मजुरांना कौशल्य वापरावे लागते. त्यांच्या कौशल्याचे मोल झालेच पाहिजे, अशी अपेक्षा शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालिदास आपेट यांनी व्यक्त केली. ‘समान वेतन, समान काम’ या नियमानुसार मजुरांना यंत्राइतकीच मजुरी मिळाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.संघटनांच्या आंदोलनातमजुरांची फरफटप्रलंबित मागण्यांसाठी ऊसतोड मजुरांच्या संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. उचल घेऊन बसलेल्या कामागारांना स्थलांतराचे वेध लागलेले आहेत. त्यांना घ्यायला येणारी वाहने अडविण्याचे सत्र विविध संघटनांमार्फत सुरुच आहे. त्यामुळे संघटनांच्या आंदोलनांमध्ये मजुरांची फरफट होते. वाहने अडविल्यानंतर मुलाबाळांसह रात्र रस्त्यावर काढावी लागते. संघटनांमध्येही एकवाक्यता नसल्याने ही स्थिती आहे. संघटनांनी एकत्रित येऊन लढा उभा केला तर आवाज बुलंद होईल अन् मजुरांची फरफटही होणार नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत यांनी व्यक्त केली.