अविनाश कदम - आष्टी (जि. बीड) : तरुणांची फसवणूक करवून विवाह करणाऱ्या व मागितलेली खंडणी न दिल्यास बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. मुलीचा मामा म्हणून मिरविणाऱ्याला अटक केल्यानंतर पोलीस इतर आरोपींचा शोध आहेत. लातूर ते खर्डापर्यंत मामाचे व लैला-मजनूचे लागेबांधे कसे जुळून आले व लग्नाळू किती मुलांना गंडा घातला याची चौकशी सुरू आहेत. (Laila-Majnu gang-Cheated married youths, search for accused continues)आष्टी तालुक्यातील शिराळ येथील तरुणाकडून विवाहापूर्वी ८० हजार रुपये घेऊन ९ मार्च रोजी विवाह केला. त्यानंतर या रॅकेटमधील अजय चवळेचा फोन सोनाली काळे हिला आला. या फोनवरील संभाषण विवाहित तरुणाने ऐकल्याने तो सावध झाला. तरुणाला नांदण्यासाठी महिलेने २ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मला फसवून लग्न करून बलात्कार केला असा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणाने पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी वसूल करताना दोघांना रंगेहाथ पकडले. प्राथमिक चौकशीत ८ जणांशी या एकाच महिलेने विवाह केल्याचे निष्पन्न झाले. या रॅकेटमध्ये किती जणांचा सामावेश आहे, किती लग्नाळू तरुण बळी ठरलेत याचा तपास पोलीस करत आहेत.
प्रेमसंबंधातून एकत्र अन् खंडणीचा शोधला धंदासोनाली काळे मूळ नांदेडची तर अजय चवळे हा लातूरचा. या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांकडून कळते. रामा बडे हा लातूरला गेल्यावर त्याची अजयशी ओळख झाली. त्याला मामा म्हणून मुलीच्या लग्नासाठी मागे उभे करायचे ठरले. त्याला किती वेळा ‘मामा’ म्हणून उभे केले याचा शोध पोलीस घेत आहेत. लग्नाळू वर शोधून सोनालीशी विवाह करून द्यायचा. त्यानंतर लाखो रुपये उकळले जायचे.