लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नवसाला पावणारा मोदकाचा गणपती म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या ‘श्रीं’ विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे अनंत चतुर्दशीस लाखो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून दर्शन घेतले.हिंगोली येथील ‘श्री’ चिंतामणी विघ्नहर्ता गणपतीची दिवसेंदिवस ख्याती वाढत असून, येथे पर राज्यातून दर्शनास येणाºया भाविकांची गर्दी वाढत आहे. त्या अनुषंगाने संस्थानतर्फे येथे येणाºया भाविकांचे दर्शन व्हावे याचे नियोजनही केले जाते. विशेष म्हणजे या अनंत चतुर्दशीला १५ लाखांच्यावर ‘श्रीं’ ला मोदक येणार असल्याने भाविकांची जराही गैरसोय न होण्यासाठी रामलीला मैदानावर भव्य मंडप टाकण्यात आला होता. शिवाय, गत वर्षी ‘श्री’ च्या दर्शनासाठी दोन रांगा लागत होत्या. यंदा केवळ एकाच रांगेत दर्शनाची व्यवस्था केली होती. शिवाय, रांगेत लागलेल्या भाविकांसाठी जागो- जागी चहा पाणी, फराळाची व्यवस्था केली होती. तर गांधीचौक, मंडप, महावीर चौक आणि मंदिर परिसरात एलईडी लावल्या होत्या. त्याच बरोबर लाऊडस्पीकरचीही व्यवस्था केली होती. त्यावरुनच भाविकांना सूचना दिल्या जात होत्या. तसेच तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने भाविकांची जराही गैरसोय झाली नाही. शिवाय विद्युत वितरण कंपनीनेही सहकार्य केले. तसेच बाहेर गावावरुन येणाºया भाविकासाठी स्थानिकाच्या अनेक नागरिकांनी स्वेच्छेने वाहनाची व्यवस्था केली होती. बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात रिक्षा उभ्या होत्या तर आरोग्य विभागाच्या वतीने या ठिकाणी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तैनात होती. शिवाय डॉक्टरांचीही टीम कार्यरत होती. या ठिकाणी चार वर्षाची हरवलेली मुलगी पोलीस कर्मचाºयांच्या तत्परतेने अवघ्या काही वेळात सापडली होती.
लाखों भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 12:40 AM