शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

दुष्काळाचे सावट सारुन लाखो भाविक नाथचरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:33 AM

नाथषष्ठी सोहळा : वारकऱ्यांच्या उत्साहाने पैठणनगरी भक्तिरसात न्हाली; वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेचा ठायीठायी अनुभव

पैठण : ‘धन्य आजि दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीण गेला, मज वाटे त्यासी आलिंगण द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे’ या नाथ महाराजांच्या अभंगाप्रमाणे मंगळवारी लाखो वारकऱ्यांची नाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर अवस्था झाली. ४ लाख भाविकांनी गेल्या दोन दिवसांत नाथ समाधीचे दर्शन घेतल्याचे नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांनी सांगितले.संत एकनाथ महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने शेकडो किलोमीटरचे अंतर पायी कापत आलेल्या वारकऱ्यांना आज समाधी दर्शनानंतर अलौकिक समाधान प्राप्त झाले. वारकºयांच्या उत्साहाने पैठणनगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली. मुखातून ‘भानुदास एकनाथ’चा जयघोष व समोरासमोर भेट होताच एकमेकांच्या होणाºया चरणस्पर्शाच्या दृश्याने वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेचा शहरात ठायीठायी अनुभव येत होता. दुष्काळाच्या संकटाने ग्रासलेल्या वारकºयांनी यंदा चांगला पाऊस पाडून शेतकºयांची ईडा पिडा टळू द्या, असे साकडे नाथ महाराजांना घातले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी वारकºयांची संख्या घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, मात्र संत एकनाथ महाराजांवर असलेल्या अपार श्रध्देने सर्व शक्यता मोडीत काढीत वारकºयांनी नाथषष्ठीची वारी दुष्काळाचे सावट दूर सारून उत्साहात पूर्ण केली.नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दिवसभर पैठण शहरात विविध मार्गाने वारकºयांच्या दिंड्यांचे आगमन होत होते. हातात भगवा ध्वज, गळ्यात तुळशीमाळ, महिला वारकºयांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखात भानुदास एकनाथांचा जयघोष, हाताने टाळ मृदंगाचा गजर करत भगवा ध्वज फडकावत शहराच्या रस्त्यावरून निघालेल्या दिंड्या, सोबत सजवलेल्या पालख्या, पुढे अश्वाची रूबाबदार स्वारी, जिकडे पाहावे तिकडे वारकरी आणि हरिनामाचा गजर, दुसरे काहीच नाही, असे पैठणनगरीचे आजचे चित्र होते. अवघी पैठणनगरी नाथभक्तीत लीन झाली होती. पैठण शहरात विसावलेल्या शेकडो दिंड्यांतून दिंडीप्रमुख, फडप्रमुख व ह.भ.प. महाराजांनी आपापल्या फडावर कीर्तन, प्रवचन करून गुरू -शिष्य परंपरेनुसार मार्गदर्शन केले.विजयी पांडुरंगास अभिषेकआज फाल्गून वद्य षष्ठी असल्याने पहाटे गावातील नाथ मंदिरात असलेल्या विजयी पांडुरंगास पंचामृत स्नान व अभिषेक नाथवंशजांच्या वतीने घालण्यात आला व विधिवत पूजा करून पुन्हा स्थानापन्न करण्यात आले. त्याचवेळी बाहेरील नाथ मंदिरातील संत एकनाथ महाराजांच्या समाधीची सुद्धा विधिवत पूजा करण्यात आली. दुपारी गावातील नाथ मंदिरातून नाथवंशज व मानकºयांची मानाची निर्याण दिंडी पारंपरिक अभंग म्हणून काढण्यात आली. दिंडीच्या अग्रभागी सजवलेला रूबाबदार अश्व, त्यानंतर जरी पटका, भानुदास महाराजांचे निशाण, झेंडेकरी त्यानंतर दिंडी विणेकरी, त्यानंतर अमृतराय संस्थानची छत्री, नाथवंशजांच्या छत्र्या, त्यानंतर संस्थानिक अंमळनेरकर महाराजांची दिंडी, भगवान गडाची दिंडी व सर्वात शेवटी वारकरी अशा क्रमाने अभंगाच्या तालावर मार्गक्रमण करण्यात येत होते. मानाची ही दिंडी गावातील नाथ मंदिरातून निघून कावळे गल्ली, उदासी महाराज मठमार्गे गोदावरीच्या वाळवंटातून बाहेरील नाथ मंदिरात पश्चिम भागातील गोदावरी द्वारातून नेण्यात आली.या ठिकाणी ‘अवघेची त्रैलोक्य आनंदचि आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एक पणी उभा, चैतन्याची शोभा शोभतसे’ जलसमाधी घेण्याअगोदर हाच अभंग घेत नाथ महाराजांनी शेवटचे कीर्तन केले होते म्हणून हा अभंग परंपरेने घेण्यात आला. यानंतर भानुदास एकनाथांच्या गजरात पूर्वद्वाराने दिंडी बाहेर पडली व परत गावातील नाथ मंदिरात नेण्यात आली. तेथे महाद्वारास भानुदास महाराजांचे निशाण लावून आरतीने सांगता करण्यात आली . नाथवंशजांच्या दिंडीचे परंपरेनुसार वाळवंटात नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी स्वागत केले. नाथवंशजांच्या दिंडीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी, भाविक दिंडी मार्गावर स्थिरावले होते.स्नानासाठी वारकरी धरणावरयंदा दुष्काळामुळे गोदावरीत पाणी न मिळाल्याने वारकºयांनी स्नानासाठी थेट मोर्चा जायकवाडी धरणाकडे वळविला. लाखो वारकरी व भाविकांनी धरणात स्नान करून गोदावरीच्या स्नानाचे पुण्य प्राप्त केले. पहाटे जायकवाडीच्या धरणाच्या पिचिंगवर दगडाऐवजी वारकरी असे विहंगम दृश्य फुलून आले होते.

टॅग्स :SocialसामाजिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम