शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

हिमायतनगरात ४ लाखांचा ऐवज लंपास

By admin | Published: February 17, 2016 11:40 PM

हिमायतनगर : शहरातील परमेश्वर गल्लीत मंगळवारी रात्री चोरी होवून सुमारे ४ लाख १० हजारांचा ऐवज लांबविण्यात आला.

हिमायतनगर : शहरातील परमेश्वर गल्लीत मंगळवारी रात्री चोरी होवून सुमारे ४ लाख १० हजारांचा ऐवज लांबविण्यात आला. चोरट्यांनी सर्वप्रथम अ‍ॅड़ दिलीप रेड्डी राठोड यांच्या घरी लोखंडी गेट व दरवाजाचे कुलूप तोडून रोख रक्कम व दागिने मिळून ३ लाख ८२ हजार ५०० रुपये लंपास केले. तर बजरंग चौकातील नंदकुमार लक्ष्मण मुधोळकर (बजरंग चौक) यांच्या घरातील रोख रक्कम व दागिने मिळून २७ हजारांचा ऐवज लंपास केला, अशी माहिती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी़ एस़ डांगरे, पोहेकॉ मंजू जाधव यांनी दिली़ परमेश्वर गल्लीतील अ‍ॅड़दिलीप राठोड हे सहकुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरी केली़ यापूर्वी शहरात तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या़ चोरटे तोंडाला रुमाल बांधून पळून जातानाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपलेले असताना चोर अद्याप सापडले नाहीत़ या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपविभागीय अधिकारी आवटे यांनी घटनास्थळी भेट दिली़ चिखली येथे ७० हजारांची चोरीइस्लापूर : मौजे चिखली (ई) येथे चोरीत ७० हजार रुपयांचा माल चोरीला गेल्याची फिर्याद दिल्याने इस्लापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ फिर्यादीत मजूर महिलेचे नाव आरोपी म्हणून टाकण्यात आले़ चौकशीअंती सत्य उजेडात येईल, असा आशावाद सपोनि संजीवन मिरकले यांनी व्यक्त केला. फिर्यादी परमेश्वर उसन्ना झरेवाड (वय ४२, रा़चिखली) यांनी अशी फिर्याद दिली, आरोपी गंगाबाई पंढरी निलावार हिने १३ फेब्रुवारी रोजी दुपारी घरातील कपाटातील सहा तोळ्याची चैन (किंमत ५० हजार), दोन तोळ्यांचे नेकलेस (२० हजार रुपये) असे एकूण ७० हजार रुपयांची चोरी झाली, अशी फिर्याद दिल्याने ठाण्यात गुन्हा दाखल झाला, अशी माहिती जमादार गायकवाड यांनी दिली़ व्यापाऱ्यांकडूनच रात्रीची गस्तनिवघा बाजार : येथे २० दिवसांत मोठ्या साखळी चोऱ्या झाल्या़ चोरट्यांनी दोनवेळा आठ दुकाने फोडून ऐवज लंपास केला़ व्यापाऱ्यांनाच टार्गेट केल्याने व्यापारी धास्तावले आहेत़ चोरटे रोजच गावात येत असल्याची चर्चा असल्याने व्यापाऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे़ यामुळे व्यापाऱ्यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली़ व्यापारी संघाचे अध्यक्ष भगवानराव शिंदे यांनी सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेवून प्रत्येक दिवशी पाच-पाच जण मिळून गस्त घालण्याचे ठरविण्यात आल्याने आता व्यापारी दररोज रात्रीला गस्त घालत आहेत़ यातच हदगाव पोलिसांची पेट्रोलिंग सुरू आहे़ यामुळे सध्यातरी चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत़ २० दिवसांत दोन वेळा चोरी झाली़ (वार्ताहर)शिक्षक दाम्पत्याचे घर भरदिवसा फोडलेबिलोली : येथील गांधीनगर भागातील महावितरण कंपनीच्या शेजारी असलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या घरी भरदिवसा चोरी झाली. दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील बारा तोळ्याचे दागिने लंपास झाले. गांधीनगर येथील प्रा. हणमंत मटके यांच्या घरात शिक्षक नागेश मठपती भाड्याने राहतात. दोघे पती-पत्नी शिक्षक असल्याने दररोजप्रमाणे सकाळी शाळेच्या वेळेला घराला कुलूप लावून बाहेर पडले. शेजारीच महावितरण कार्यालय तर दुसऱ्या बाजूला पूज्य साने गुरुजी विद्यालयाची शाळा आहे. घरमालक प्रा. मटके देखील महाविद्यालयासाठी जाण्याकरिता बाहेर निघाले. तेव्हा मठपती यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. दोघेही शिक्षक पती-पत्नी घरी नाहीत मग दार का उघडे म्हणून आत बघितले तर कपाट आडवे पडलेले व फोडलेले दिसले. यावरुन चोरी झाल्याची घटना समोर आली. चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने ज्यात गंठण, कानातले फूल, लॉकेट, अंगठी असे जवळपास १२ तोळे दागिने गायब केले. याबाबत बिलोली पोलिसांत तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. भरदिवसा घर फोडल्याने संपूर्ण गांधीनगर व बिलोलीत भीतीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)