भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माधुरी अदवंत, शहर- जिल्हा अध्यक्ष अमृता पालोदकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी रहाटकर म्हणाल्या की, ६ फेब्रुवारी २०२० पासून राज्य महिला आयोगाचे पद रिक्त आहे. आयोगाच्या अन्य सदस्यांना बेकायदेशीर पद्धतीने बडतर्फ करण्यात आले असून, आयोगाचे इतर अधिकारी सध्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्र्याच्या दिमतीला देण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये घरगुती हिंसाचार, महिला अत्याचार, बालविवाह यासारख्या घटनांनी उच्चांक गाठलेला होता. तरीही महिला आयोगाचा कारभार मात्र थंड पद्धतीने चालला आहे, ही गंभीर बाब आहे.
चौकट :
संभाजीनगर की औरंगाबाद
३० वर्षे सत्तेत राहून शिवसेनेने संभाजीनगर या नावाचा पुरस्कार केला. आता मात्र इतकी वर्षे विरोधात असलेल्या पक्षांसोबत मैत्री करून शिवसेनेने आपल्या तत्त्वांना मुरड घातली आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी इतकी वर्षे जपलेली भूमिका सोडणे योग्य आहे का, असा सवालही रहाटकर यांनी उपस्थित केला.