शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

ड्रायपोर्टच्या लोहमार्गासाठी लवकरच होणार भूसंपादन

By admin | Published: July 11, 2017 12:13 AM

जालना : ड्रायपोर्ट ते दिनेगाव स्थानकापर्यंत अंथरण्यात येणाऱ्या लोहमार्गाचा आराखडा तयार करण्यात आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ड्रायपोर्ट ते दिनेगाव स्थानकापर्यंत अंथरण्यात येणाऱ्या लोहमार्गाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दिनेगाव स्थानकानजीक रेल्वेट्रॅक व अन्य विकास कामांसाठी जेएनपीटीला सुमारे १८० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. यासाठीची लवकरच भूसंपादन करण्यात येणार आहे.जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. बैठकीस जेएनपीटीचे संचालक विवेक देशपांडे, अनुप अग्रवाल, जय कुमार, अर्जुन गेही, स्वप्नील चिंतलवार, रमेश येऊल, राजेश जोशी, पी. एन. प्रकाश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार डॉ.विपीन पाटील, सुजीत गाढे आदींची उपस्थिती होती.ड्रायपोर्टच्या सुरक्षा भिंतीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. ड्रायपोर्ट ते जालना-औरंगाबाद महामार्गापर्यंत कंटेनर वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ता तयार करण्यात येणार आहे. यासाठी संपादित करावयाच्या जमिनीचे मोजमाप पूर्ण झाले आहे. सदर जमिनीचा शेतकऱ्यांना द्यावयाचा मोबदला निश्चित करून संपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी विनंती जेएनपीटीच्या सदस्यांनी जिल्हा प्रशासनास केली. त्याचबरोबर ड्रायपोर्ट ते दरेगावनजीक असलेल्या दिनेगाव स्थानकापर्यंत स्वतंत्र लोहमार्ग अंथरण्यात येणार आहे. या लोहमार्गाच्या आराखड्याचे काम रेल्वेने पूर्ण केले आहे. या लोहमार्गामुळे ड्रायपोर्टमधून थेट रेल्वे वाहतूक शक्य होणार आहे. वाहतुकीसाठी दिनेगाव स्थानकालगत मालधक्का तयार करण्यात येणार आहे. यासाठी अकरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे.तसेच मालवाहू रेल्वे उभ्या करण्यासाठी दुहेरी रेल्वेमार्ग अंथरण्याचे नियोजन आहे. या कामांसाठी दिनेगाव स्थानकालगतची १८१ हेक्टर जागा संपादित करण्याचे जेएनपीटीचे नियोजन आहे. संपादित करावयची जमीन, तिचे मोजमाप व दर निश्चित करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सूचना जिल्हा प्रशासनास देण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जसगाव शिवारात जाऊन ड्रायपोर्टच्या परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली.