लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गांधेलीतील गट एकत्रीकरणानंतर निर्माण झालेल्या समस्यांमुळे हवालदिल झालेले शेतकरी २१ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. सातबºयावरील जमीन भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे कमी झाल्याचा आरोप शेतकºयांनी आज पत्रकार परिषदेत केला.शेतकºयांनी सांगितले की, गांधेली येथील बहुतांश शेतकºयांच्या जमिनीच्या क्षेत्रफळाबाबत भूमी अभिलेखच्या नकाशांमध्ये चुका झालेल्या आहेत. विभागाने केलेल्या चुकांमुळे अनेक शेतकºयांचे जीवन उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. चुका दुरुस्त करण्यासाठी शेतकºयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. अभिलेख कार्यालयातून दस्तावेज मिळवून काही भूमाफियांनी गांधेलीतील सुमारे २०० शेतकºयांच्या जमिनीवर मालकी हक्क मिळविण्याचा प्रकार सुरू केल्याचा आरोप शेतकºयांनी केला.मगन रोरे यांची गट क्र.२३२ मध्ये २६ एकर जमीन आहे. रोरे यांनी ज्यांच्याकडून जमीन विकत घेतली ते हयात नाहीत. परंतु त्यांचे नातेवाईक आता जमिनीवर मालकी असल्याचा दावा करून न्यायालयात गेले आहेत. गट क्र. ११२ मधील गोविंद पोले व नातलगांची ७ एकर २८ गुंठे जमीन आहे. शेख अमीर याची नावे मालकी हक्कात आली आहेत. पोले यांच्या ताब्यात जमीन असताना त्यांची नावे सातबाºयावर नाहीत. शे.अमीर साबू यांनी गट क्र.१०० मधील ७ एकर जमीन लक्ष्मण पोले यांच्याकडून घेतली. त्या जमिनीच्या सातबाºयावर शेख अमीर साबू व त्यांच्या कुटुंबियांची नावे नाहीत. कल्याण पोले यांची त्यावर नावे आहेत. गट क्र.१५८ मधील जयाबाई पोले व इतरांच्या ३२ एकर जमिनीतून १२ एकर जमीन सातबाºयाच्या उताºयातून गायब झाली. आता त्यातून दुसरा वाद निर्माण झाला. गट क्र.२५,२६ मध्येही अशाच चुका झाल्या. पत्रकार परिषदेला गोविंद पोले, बळीराम पोले, शेख वजीर भाई, शेख अय्युब भाई, संजय रोरे आदींची उपस्थिती होती.
गांधेलीत सातबाºयावरील जमीन घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 1:20 AM