लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : या आठवड्यात जिल्ह्यातील विविध भागात अधून- मधून पाऊस हजेरी लावत असल्याने खरिपाची पिके धोक्याच्या बाहेर आली आहेत. त्यातच गंभीर बनलेला पाणी प्रश्नही सुटण्यास मदत झाली आहे. रविवारी तर दिवस भर थांबून थांबून पाऊस हजेरी लावत असल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहत होते. ता अजून काही दिवस पावसाचा असाच जोर राहिल्यास रबीचे उत्पन्न वाढण्यास मदत होण्याची चिन्हे आहेत.यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने जोरदार हजेरी लावली होती. नंतर मात्र पाठ फिरविल्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. मात्र आठवडा भरापासून हजेरी लावत असलेल्या पावसाने पिकांना दिलासा मिळाला आहे. त्यातच २६ आॅगस्ट पासून सलग पाऊस सुरु असल्यामुळे शेतकºयांंतून समाधान व्यक्त होत आहे. तर रविवारी सकाळ पासून पावसाचा जोर होता. दिवस भर थांबून - थांबून पडत असलेल्या पावसामुळे मात्र रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. मागील काही दिवसांपूर्वी पाऊसच नसल्याने बºयाच गावात पिण्यासाठी रात्र जागून काढण्याची वेळ येत होती. उन्हाळ्यासारखीच स्थिती निर्माण झाली होती. मात्र उशिरा का होईना पावसाने तारल्यामुळे पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यास मदत झाली आहे. अद्यापपर्यंत ४२७. १८ पावसाची नोंद झाली असून, आज १४.८८ मिमी एवढा पाऊस झाला आहे.मागील काही दिसांपूर्वी हवामान खात्याने वर्तविलेला अतिवृष्टीचा अंदाज मात्र खरा ठरल्याचे दिसून आले. रविवारी तर जिल्ह्यातील विविध भागात हजेरी लावलेल्या पावसाने चांगलीच तारांबळ उडाली होती. तर बºयाच भागातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात वाढले होते.
जिल्ह्यात मोठ्या पावसाने अनेकांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:10 AM