शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

नारेगाव ग्रामस्थांची कचरा डेपोसाठी औरंगाबाद मनपास  अखेरची मुदतवाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 6:31 PM

नारेगाव भागातील शेतकर्‍यांनी कचर्‍याच्या प्रश्नावर महापालिकेला आता अखेरची एक महिना मुदतवाढ दिली आहे. १६ फेबु्रवारीनंतर एकही ट्रक नारेगाव कचरा डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका रविवारी शेतकर्‍यांनी मांडकी येथील मारुती मंदिरात घेतली.

ठळक मुद्दे कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने मागील तीन महिन्यांमध्ये कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. परदेश वार्‍या आणि विविध महापालिकांनी सुरू केलेले प्रकल्प पाहण्यातच प्रशासन दंग आहे. १६ फेबु्रवारीनंतर एकही ट्रक नारेगाव कचरा डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका रविवारी शेतकर्‍यांनी घेतली

औरंगाबाद : नारेगाव भागातील शेतकर्‍यांनी कचर्‍याच्या प्रश्नावर महापालिकेला आता अखेरची एक महिना मुदतवाढ दिली आहे. १६ फेबु्रवारीनंतर एकही ट्रक नारेगाव कचरा डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका रविवारी शेतकर्‍यांनी मांडकी येथील मारुती मंदिरात घेतली. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने मागील तीन महिन्यांमध्ये कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. परदेश वार्‍या आणि विविध महापालिकांनी सुरू केलेले प्रकल्प पाहण्यातच प्रशासन दंग आहे.

१९८३-८४ पासून महापालिका नारेगाव येथील गट नं. ७८, ७९ मधील ४४ एकर जागेवर कचरा टाकत आहे. मागील ३४ वर्षांमध्ये महापालिकेने कचर्‍यावर प्रक्रिया करणारा कोणताही प्रकल्प सुरू केला नाही. एक प्रकल्प सुरू केला होता, तो अल्पावधीतच बंद पडला. सध्या नारेगावात २० हजार टनांपेक्षा जास्त कचरा साचलेला आहे. कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे पंचक्रोशीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत. कचर्‍यामुळे चिकलठाणा विमानतळाच्या व्यवस्थापनाने विमान धावपट्टीवर उतरताना, उड्डाण घेताना पक्ष्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार केली होती. दूषित कचर्‍यामुळे नारेगाव व आसपासच्या गावांमधील पिण्याचे पाणी दूषित होत असल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे. आठ वर्षांपूर्वी खंडपीठानेही कचरा डेपो दुसरीकडे न्यावा, असे आदेश महापालिकेला दिले आहेत. मात्र, आजपर्यंत महापालिकेने यासंदर्भात कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही.

ठोस निर्णय नाहीनारेगावच्या शेतकरी आंदोलनाला तीन महिने होत आले तरी मनपाने कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. चीन दौरा, मुंबई दौरा करण्यात आला. प्रभागनिहाय कचर्‍यावर प्रक्रिया करणे, नारेगाव येथील कचरा नष्ट करण्यासाठी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

तीन दिवस आंदोलन१३ आॅक्टोबर २०१७ रोजी कचरा डेपोच्या विरोधात अनेक गावांतील  शेतकर्‍यांनी उपोषण केले होते. याचा परिणाम म्हणून तीन दिवस महापालिकेची एकही गाडी नारेगाव कचरा डेपोवर येऊ शकली नव्हती. १५ आॅक्टोबर रोजी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी करून तीन महिन्यांची मुदत मनपाला दिली. उद्या १६ जानेवारीर रोजी ही मुदत संपत आहे.

संक्रांतीच्या दिवशी निर्णयरविवारी कचरा डेपो हटाव आंदोलन समितीची एक बैठक मांडकी येथील मारुती मंदिरात घेण्यात आली. बैठकीत सर्वानुमते मनपाला आणखी एक महिन्याची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. १६ फेब्रुवारीनंतर महापालिकेची वाहने कचरा डेपोत न येऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाऊसाहेब गायके, डॉ. विजय डक, विष्णू भेसर, राजू भेसर, रावसाहेब चौथे आदींसह पदाधिकारी हजर होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद