शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

गतवर्षी ग्रहणाने खंड पडला, यंदा कोजागरीचा उत्साह शिगेला; दूध, केशर विक्रीत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 3:08 PM

सर्वसामान्यांमध्ये कोजागरीचा उत्साह असून, शहरात विविध काॅलनींमध्ये नागरिकांनी कोजागिरी साजरी करण्याचे नियोजन केले आहे.

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी खंडग्रास ग्रहणामुळे कोजागरीला मसाला टाकून गरमागरम दूध पिण्याच्या इच्छेवर लगाम घालावा लागला होता. मात्र, दोन वर्षांनंतर यंदा नागरिकांमध्ये कोजागरीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बुधवारी दूध, केशर आणि दूध मसाल्याची विक्री वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांनीही जय्यत तयारी केली आहे.

कोजागरी पौर्णिमा बुधवारी आहे. जिल्ह्यातून आणि परजिल्ह्यांतून दोन ते तीन लाख लिटर दुधाचा पुरवठा होणार आहे. याशिवाय २०० ते ३०० किलो दूध मसाला आणि २ किलो केशर विक्री होण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांमध्ये कोजागरीचा उत्साह असून, शहरात विविध काॅलनींमध्ये नागरिकांनी कोजागिरी साजरी करण्याचे नियोजन केले आहे.

रोजच्या पेक्षा १५ लिटर अधिक विक्रीचा अंदाजदररोज साधारणपणे ३० हजार लिटर दुधाची विक्री होते. काेजागिरीला यंदा १० ते १५ हजार लिटर अधिक दुधाची विक्री होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश पहाडिया यांनी दिली.

२ किलो केशर विक्रीची शक्यता२१० रुपये प्रति ग्रॅम या दराने केशरची विक्री होते. कोजागिरीला २ किलो केशर विक्रीतून ४ लाख रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. त्याबरोबरच दूध मसाला विक्रीतून १५ लाखांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. १०, २०, ५०, १०० ग्रॅमच्या पाकिटमध्ये दूध मसाला उपलब्ध आहे, अशी माहिती व्यापारी विलास साहुजी यांनी दिली.

बनावट केशर कसा ओळखाल?वास्तविक केशर पाण्यात विरघळत नाही. तसेच भिजल्यावर सोनेरी-पिवळा रंग सोडतो. तर नकली केशर विरघळतो आणि ताबडतोब रंग सोडतो, अनेकदा पाणी लाल होते. अस्सल केशरला त्याचा रंग येण्यासाठी काही मिनिटे लागतात. अस्सल केशराला किंचित गोड आणि मातीची चव असते. मधासारखा सुगंध असतो. बनावट केशरची चव अनेकदा कडू असते आणि विशिष्ट सुगंध नसतो.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरmilkदूधkojagariकोजागिरी