औरंगाबाद : गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या २४ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात लातूरसह जळगाव, पुणे, नागपूर, कोल्हापूर, अमावती संघाने उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या गटात जळगाव, पुणे, नागपूर, कोल्हापूर संघाने अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला.आज झालेल्या सामन्यांचे निकाल (मुले) : नवी मुंबई विजयी विरुद्ध बीड ३-२, लातूर विजयी वि. अकोला १४-५, नागपूर वि. वि. औरंगाबाद ९-७, कोल्हापूर वि. वि. मुंबई ८-0, वर्धा विजयी वि. पिंपरी चिंचवड १३-0, जळगाव विजयी वि. नाशिक ७-0, अमरावती विजयी वि. वर्धा ७-0, सोलापूर विजयी विरुद्ध जळगाव १२-0. मुली : पुणे विजयी वि. सांगली १४-३, जळगाव विजयी वि. अमरावती ४-१, नागपूर विजयी वि. नवी मुंबई १२-११, कोल्हापूर विजयी वि. मुंबई ग्रामीण १0-0.दरम्यान, या स्पर्धेला राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकारी अविनाश आघाव व राष्ट्रीय बॅडमिंटनपटू व जिल्हा संघटनेचे सचिव सिद्धार्थ पाटील यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे सचिव प्रदीप तळवेलकर, नाजूक पाखले, नितीन पाटील, हेमंत देशपांडे, अभय बिराज, गोकुळ तांदळे, उदय डोंगरे, पी.आर. थोटे, बाळू चव्हाण, प्रवीण शिंदे, राकेश खैरनार, प्रदीप बोरसे, दीपक रुईकर, अमृत बिºहाडे, फकीरराव घोडे, सुरेश फुके, दिनेश वंजारे, मुकुल देशपांडे, कोमल शेंडे, स्वप्नील राऊत, हर्षल मोरे, विजय कदम, निरंजन गायकवाड, प्रीतम यादव, कुणाल येवले, सायली पाटील, स्नेहल जाधव, जुही मकेश्वर, गणेश बेटुदे, अक्षय बिरादार, सचिन बोर्डे, संतोष अवचार, भीमा मोरे, सुजित चौधरी, योगेश कुलकर्णी आदी परिश्रम घेत आहेत.
लातूरचा संघ उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:33 AM
: गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या २४ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात लातूरसह जळगाव, पुणे, नागपूर, कोल्हापूर, अमावती संघाने उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या गटात जळगाव, पुणे, नागपूर, कोल्हापूर संघाने अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला.
ठळक मुद्देराज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा : जळगाव, पुणे, कोल्हापूरही सेमीफायनलमध्ये