लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विविधरंगी चनिया चोली, राजस्थानी घागरा, लाछा, दांडिया स्पेशल घागरा, धोती- कुर्ता आणि खास टोपी, अशा थाटात नटलेली तरुणाई ‘लोकमत रंगिलोे दांडिया’च्या तालावर थिरकली आणि शहरात दांडियाला ख-या अर्थाने प्रारंभ झाल्याचे उपस्थिताना वाटले. प्रोझोनच्या सहकार्याने आयोजित लोकमत रंगिलो दांडियाला सोमवारी प्रोझोनच्या हिरवळीवर दणक्यात सुरुवात झाली.उपायुक्त वर्षा ठाकूर यांच्या हस्ते देवीची पूजा आणि आरती करण्यात आली. याप्रसंगी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप विष्णोई, प्रोझोनचे मोहम्मद अर्शद, डॉ. विजय प्र. चाटोरीकर, वृषाली चाटोरीकर, विजय वाडकर, मानसी वाडकर, गिरीश मिमरोट, मंगेश पाटील, वैष्णवी दरख, प्रणव दरख, संदीप काळे, मनोज बोरा, जितेंद्र सलुजा या मान्यवर अतिथींची उपस्थिती होती. आरती झाली आणि अखेर तरुणाईची प्रतीक्षा संपली. एकच जल्लोष करीत उपस्थितांनी पारंपरिक दांडियाची डौलदार सुरुवात केली. मंगळवार आणि बुधवार (दि.२६ व २७) हे दिवस सखी मंच सदस्या आणि प्रिव्हिलेज मंचच्या सदस्यांसाठी विशेष महत्त्वाचे आहेत. हे दोन दिवस या सदस्यांना दांडिया खेळण्यासाठी किंवा बघण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाईल. ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. सर्व ताणतणाव विसरून गरब्याच्या रंगात स्वत:ला रंगवून घेण्याचा, मित्रांच्या आणि प्रियजनांच्या सहवासात धूम करण्याचा हा उत्सव आहे. शहरातील सर्वात मोठा आणि धमाकेदार असा हा ‘रंगिलो दांडिया’ उत्सव संपूर्ण कुटुंबासाठीच चैतन्यदायी ठरणार हे निश्चित. फूड- फन- फॅ मिली असा तिहेरी आनंद देणाºया या महोत्सवाला नक्की भेट द्या. सृष्टी हॉटेल, अॅग्रो टुरिझम अॅण्ड नर्सरी हे असोसिएट पार्टनर आहेत. भाग्यविजय, अभिनव इंटरनॅशनल स्कूल, कुचिना दरक डिस्ट्रिब्युटर्स, एक्सप्रेसो कॉफी हे या उत्सवाचे सहप्रायोजक आहेत.
‘लोकमत रंगिलो दांडिया’ला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:56 AM