शेंद्रा : करमाड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या साह्याने टोमॅटो खरेदी केंद्र सोमवारी सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी ज्ञानेश्वर एकनाथ सोळुंके यांच्या टोमॅटोच्या एका कॅरेटला ५५१ रुपये भाव मिळाला. तालुक्यात टोमॅटो उत्पादन मोठ्या असल्याने या खरेदीकेंद्राचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
करमाड डाळींबाच्या खरेदी केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत करमाड येथे सोमवारपासून टोमॅटो खरेदीकेंद्र सुरू करण्यात आले.
औरंगाबाद तालुक्यातील करमाड , शेंद्र्रा , वरुड , गोलटगाव , कुबेर गेवराई , वरझडी या परिसरात टोमॅटो उत्पादक शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात असल्याने या खरेदीकेंद्राचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, असे मत टोमॅटो उत्पादक शेतकºयांनी व्यक्त केले.
या खरेदीकेंद्रावर पहिल्या दिवशी ४०० ते ५५१ रुपये भाव मिळाला.खरेदी केंद्राचा शुभारंभ प्रगतशील शेतकरी विठ्ठल भोसले यांच्याहस्ते करण्यात आला.
त्यावेळी कृउबाचे सभापती राधकीसन पठाडे , संचालक श्रीराम शेळके , सचिव विजय शिरसाठ , कर्मचारी अनिल आधाने , धनंजय देशपांडे , ईश्वर गिरी , गजानन काथार यांच्यासह शेतकरी बद्री कुबेर , बंडू साळुंके , ज्ञानेश्वर घावटे , रवी घावटे आदी उपस्थित होते.सध्या सगळीकडेच टोमॅटोच्या कॅरेटचे वजन २० किलो गृहीत धरून भाव ठरवला जातो. परंतु व्यापारी त्यांच्या कॅरेटमध्ये जेंव्हा माल भारतात तेंव्हा दाबून दाबून १ कॅरेटमध्ये जवळपास २८ किलो भारतात. त्यात शेतकºयांचे नुकसान होते. त्यामुळे करमाड येथे भाव हा किलोनुसार निश्चित करून प्रत्येक कॅरेट हे २० किलोचे भरावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.