शेंद्रा : ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत शेंद्राबन येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
औरंगाबाद वन विभागमधील शेंद्रा बन येथे गट नं ५६ मध्ये इकोबटालियन व वनविभागा यांच्या संयुक्त विधमाने वृक्षलागवड होणार असून २५ हेक्टर क्षेत्रावर २५ हजार वृक्षलागवड होणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला.
यावेळी औरंगाबादच्या पंचायत समिती सभापती ताराबाई उकर्डे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य वनरक्षक प्रकाश महाजन, इकोबटालियनचे सी.ओ. व्यंकटेश, मेजर कदम, मेजर भटनागर, उपवनसंरक्षक सतीश वडस्कर, सामाजिक वनीकरणाचे विभागीय अधिकारी केसकर, सरपंच कल्याण तुपे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी.तांबे, लायन्स क्लबच्या महिला अधिकारी व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.