शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विधि विद्यापीठ देणार नागरिकांना कायद्याचा मोफत सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 7:48 PM

नागरिकांच्या मदतीसाठी ‘विधि सहायता केंद्रा’ची स्थापना होणार

ठळक मुद्देपॅरा लीगल व्हॉलेंटिअरची नेमणूक होणार

- राम शिनगारे 

औरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठात सर्वसामान्यांना कायदेविषयक मोफत सल्ला देण्यासाठी ‘विधि सहायता केंद्र’ स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे. या केंद्राचे उद्घाटन ८ मार्च रोजी होईल, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अशोक वडजे यांनी दिली.

शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये सुरू झालेल्या विद्यापीठाची स्वतंत्र इमारत कांचनवाडी परिसरात बांधण्यात येत आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबरोबरच विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या ‘विधि सहायता केंद्रा’ चे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

या केंद्राच्या संचलनासाठी न्यायालयामधील ‘विधि सेवा समिती’च्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेतला जाईल. कोणताही व्यक्ती केंद्रात येऊन कायद्याविषयी सल्ला मागू शकतो. एखाद्या प्रकरणात गंभीर गुन्हा केलेला आरोपी सल्ला मागण्यासाठी आल्यास त्यास केवळ जामीन मिळविण्याचा अधिकार असल्याचे सांगण्यात येईल. यासंदर्भात न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन केले जाईल. तसेच हा सल्ला देताना कायद्याच्या पळवाटा मात्र सांगितल्या जाणार नाहीत, असेही डॉ. वडजे यांनी सांगितले.

पॅरा लीगल व्हॉलेंटिअरची नेमणूक होणारविधि सहायता केंद्रात विद्यार्थ्यांची नेमणूक पॅरा लीगल व्हॉलेंटिअर म्हणून केली जाणार आहे. कोणतीही व्यक्ती विधि सल्ला मागण्यासाठी आल्यानंतर त्यास योग्य तो सल्ला देण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित केसचा अभ्यास करावा लागेल.  तसेच त्या केससंदर्भात न्यायालयात घडणाऱ्या घडामोडींची माहिती ठेवावी लागेल.न्यायालयाची आॅर्डर काय झाली. त्याचा अर्थ काय निघतो. याविषयीचा अभ्यास करून संबंधित व्यक्तीला सल्ला मिळेल. यासाठी न्यायालयातील ‘विधि सेवा समिती’ची मदत होईल, असेही डॉ. वडजे यांनी सांगितले.

टॅग्स :National Law Universityनॅशनल लॉ युनिव्हर्सिटीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी