जालना : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम गुरूवारी जाहीर झाल्यापाठोपाठ या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील वातावरण पूर्णत:ढवळून निघाले आहे. आता संपूर्ण महिना मोर्चेबांधणीसह डावपेच व प्रचाराच्या धुराळ्याने न्हाहून निघणार असे चित्र आहे. गेल्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या. तेंव्हापासूनच या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रास विधानसभा निवडणुकांचे वेध लागले होते. विशेषत: जिल्ह्यातील मात्तबर पुढाऱ्यांनी जय-पराजयाचे विश्लेषण, आत्मपरीक्षण करीत विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीस सुरुवात केली. एकेक दिवस महत्वाचा आहे, हे ओळखून या पुढाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात गेल्या दीड दोन महिन्यांपासून विविध विकास कामांच्या भूमिपूजनांसह उद्घाटने व लोकार्पण सोहळ्याचा धूमधडका लावला होता. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकले हे ओळखून या मात्तबर पुढाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात शेकडो कार्यक्रमे ओटोपली. शासकीय योजनांचा शुभारंभ,उद्घाटने वगैरे कार्यक्रमांना अक्षरश: राजकीय स्वरुप आले होते. गंमत म्हणजे पुढाऱ्यांनी या कार्यक्रमांतून सत्तारुढ स्थानिक विरोधक असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना पद्धतशीपणे दूर ठेवले. त्याचा परिणाम म्हणजे विरोधकांनी सुद्धा पुन्हा कार्यक्रम घेऊन एकाच गोष्टीचा दोन वेळा सोहळे आटोपून सर्व सामान्य नागरिकांना आचंबित केले. त्याही पलिकडे म्हणजे काही कार्यक्रमांमधून शासकीय यंत्रणेलाच कोणताच सहभाग नव्हता. हे विशेष.या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून आज ना उद्या आचारसंहिता लागणार म्हणून जिल्ह्यातील पुढारी प्रत्येक तासाचा सदोपयोग व्हावा म्हणून दंग होते. शासकीय कार्यालयांमधून वेगवेगळे प्रस्ताव मंजुरीपासून कामांच्या आदेशासाठी लोकप्रतिनिधींनी चढाओढ सुरु केली. त्याचा परिणाम म्हणजे संपूर्ण यंत्रणा सुद्धा गेल्या पंधरा दिवसांपासून कामे आटोपण्यात व्यस्त होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने शुक्रवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत सविस्तर कार्यक्रम पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांपर्यंत पोहचल्यापाठोपाठ जिल्ह्यातील राजकीय क्षेत्र अक्षरश: सतर्क झाले. कपड्यांवरील धूळ झटकून कार्यकर्त्यांनी तातडीने पुढाऱ्यांचे बंगले गाठले. हितगुज सुरु केले. तर सत्तारुढ व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी तातडीने बैठकांचे सत्र सुरु केले. एकूण प्रचाराचा कालावधी ओळखून रात्री उशिरापर्यंत मोजक्याच विश्वासू कार्यकर्त्यांबरोबर पुढाऱ्यांनी राणनीती आखण्यास सुरुवात केली. शनिवारी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत प्रबळ दावेदार असणारे उमेदवार आपापल्या कार्यक्षेत्रात दिवसभर ठाण मांडून होते. आता एक तास सुद्धा वाया घालायचा नाही असा संकल्प या मात्तबरांनी सोडला. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर जिल्ह्यातील पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तपशील गोळा केला. अवघ्या महिनाभरातच निवडणुकीचे सर्व सोपस्कार पार पडणार आहेत.४हे ओळखून कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तर प्रचारास अवघ्या पंधरा दिवसांचा कालावधी ओळखून मात्तबर पुढारी बुचकळ्यात पडले. ४दिवाळी पूर्वीच निवडणुका होणार आहेत. मतदानापाठोपाठ मतमोजणीही होणार असल्याने दिवाळी आनंद साजरी करता येणार असल्याने कार्यकर्ते सुखावले आहेत.४ तसेच पंधरा दिवसांतच प्रचार आटोपणार असल्याने पुढारीही खऱ्या अर्थाने सुखावले आहेत. वरकरणी ते अपुरा वेळ मिळत असल्याचे तक्रार करीत आहेत.
पुढाऱ्यांची लगीनघाई सुरू
By admin | Published: September 13, 2014 11:24 PM