शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नेत्यांनो, सातारा- देवळाईतून गुंठेवारी हद्दपार करणार की नाही? नागरिकांचा संतप्त सवाल

By साहेबराव हिवराळे | Published: May 02, 2024 7:57 PM

नागरिकांत ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराजीचा सूर

छत्रपती संभाजीनगर : कष्टाची पै-पै जमा करून म्हणजे आयुष्याची पुंजी साठवून बांधलेला हा आमचा निवारा आहे. सातारा- देवळाई ग्रामपंचायतीपासून आम्ही कर भरतो, आता मनपालाही कर देतो. मग गुंठेवारी कशासाठी? नेत्यांनो, गुंठेवारी हद्दपारी करणार की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी व्यक्त केला.

शनिवारी सायंकाळी गुंठेवारीच्या विरोधासाठी श्रीराम मंदिर, रामविजय सहकारी गृहनिर्माण संस्था, अलोकनगर येथे बैठक घेण्यात आली. प्रास्ताविक राजेंद्र फिरोदिया यांनी केले. प्रा. एकनाथ साळुंके यांनी आंदोलन तीव्र करावे, असे मत व्यक्त केले. माजी सैनिक मोहन सोन्नेकर, आर डी. भुकेले, दीपक कुलकर्णी, इंजि. उद्धव डंबाळे, विष्णू तांबट यांनीही सूचना मांडल्या. गुंठेवारी रद्द करण्यासाठी एकजुटीचे आवाहन रवींद्र पिंगळीकर यांनी केले.

शांततामय मार्गाने आंदोलनसर्व राजकीय पक्षांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. आम्ही प्रश्न सोडवू असे म्हणत आहेत. आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन करत असताना मनपा आयुक्त आमच्या शिष्टमंडळाशी फार तिरस्काराने बोलले, याचा आम्ही निषेध करीत आहोत.- स्मिता अवचार, रहिवासी

मध्यमवर्गीय लोकांची प्रचंड हालअपेष्टासातारा देवळाई परिसराला जी किंमत आली आहे, ती आम्ही मध्यमवर्गीय लोकांनी प्रचंड हालअपेष्टा सहन करून येथे टिकून राहिल्यामुळे, पण गुंठेवारीच्या नावाखाली प्रचंड दंड वसूल केला जातोय. गेली ७ वर्षे मनपा टॅक्स घेतेय, पण पाणी, ड्रेनेज रस्ते द्यायचे नाव नाही. गुंठेवारी करा म्हणते, एकेका नागरिकाला गुंठेवारी करायला भाग पाडते.- नामदेव बाजड, रहिवासी.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका