सोयगाव : तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येला शनिवारपासून अचानक गळती लागली आहे. यामुळे तालुक्यातील दोन्ही कोविड केंद्रे रिकामी होत आहेत.
मागील आठवड्यात बेडसाठी भटकंती करणाऱ्या कोरोना रुग्णांना शासनाच्या कोविड केंद्रातही बेड मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे जरंडी व निंबायती या दोन्ही कोविड केंद्रातील बेड रिकामे होत आहेत. सध्या तालुक्यात सोयगाव - ३, जरंडी - ९, फर्दापूर - ३, पळाशी - २, बहुलखेडा - १ गलवाडा - १, घोसला - ३, पहुरी - ३, दस्तापूर - १, बनोटी - १, मुखेड - १, म्हशिकोठा - ३, निंबायती - १, वरसाडा - १ याप्रमाणे रुग्णसंख्या असून, येथील रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये घोरकुंड - १, पहुरी - २, जरंडी - ४, निंभोरा - १, सोयगाव - १, फर्दापूर - २ अशा अकराजणांचा समावेश आहे.