शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

प्रत्यक्ष प्रयोगातून शिका वैज्ञानिक गंमती जमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:35 AM

द यलो डोअर’तर्फे ‘प्रथम’च्या साह्याने १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान लोकमत भवन येथे एक भन्नाट ‘वैज्ञानिक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये अद्यापही पाठांतरावर अधिक जोर दिला जातो. विज्ञानासारख्या विषयाच्या बाबतीत तर हे अधिकच मारक ठरते. अशा ‘पोपटपंची’ दृष्टिकोनामुळे विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पनाच उमजत नाही. मुळात विज्ञान शिकताना नावीन्यता, सृजनशील विचार आणि प्रायोगिक शिक्षण पद्धती गरजेची असते.हीच बाब लक्षात घेऊन ‘द यलो डोअर’तर्फे ‘प्रथम’च्या साह्याने १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान लोकमत भवन येथे एक भन्नाट ‘वैज्ञानिक कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. या विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करणे, विविध उपकरणे हाताळणे आणि आपले नैसर्गिक कुतूहल अजमावून पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वय वर्ष ९ ते १५ या गटातील मुलांना या कार्यशाळेत सहभागी होता येईल.‘जपानच्या मोनोरेलसारख्या अत्यंत क्लिष्टवैज्ञानिक संकल्पनाही साधी-साधी उपकरणे आणि साहित्यांचा वापर करून शिकविल्या जाऊ शकतात. त्यामागील अपकर्षणाचे विज्ञान समजून घेणे फारसे अवघड नाही. विद्यार्थ्यांना समजेल अशा रंजक प्रकारे शिकविले की त्यांना चटकन कळते. तेच काम या विज्ञान कार्यशाळेत केले जाणार आहे’, अशी माहिती ‘द यलो डोअर’च्या प्रतिनिधीने दिली.या कार्यशाळेत निरीक्षण, प्रयोग, पॅटर्न ओळखणे, तर्क, हाताने मॉडेल तयार करणे आदी गोष्टींच्या आधारे मूलभूत वैज्ञानिक संकल्पना उलगडून दाखविण्यावर भर देण्यात येणारआहे.कार्यशाळेच्या सात दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांचे प्रशिक्षण देण्यात येईल. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी (२६ नोव्हेंबर) वैज्ञानिक मेळावा (सायन्स फेअर) भरणार आहे. यामध्ये स्वत: विद्यार्थीच मेळाव्याला भेट देणा-यांना विविध प्रयोग आणि वैज्ञानिक संकल्पनांविषयी माहिती देतील. यामुळे एक तर विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होतील आणि त्याचा फायदा त्यांना पुढील उच्चशिक्षणासाठी होईल. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचाही हेतू यातून साध्य होणार आहे.कार्यशाळेमध्ये सहभागी होणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अशा या अनोख्या आणि भन्नाट कार्यशाळेत आपल्या पाल्याला प्रवेश देऊन आपण त्यांच्या वैचारिक प्रगतीला वाव मिळवून देऊ शकता. तर मग विचार कसला करता? आजच आपला सहभाग निश्चित करण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्कसाधा.