जायकवाडी : पैठण-औरंगाबाद मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून, हा संपूर्ण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे रहदारीच्या या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच आहे. पैठण-औरंगाबाद या मुख्य रस्त्यावर पैठण एमआय़डीसी असून, या ठिकाणी कामगारांची वर्दळ असते. अरुंद रस्ता व त्यावरील खड्डे चुकवताना अपघात मालिका काही थांबविता येईना. त्यामुळे चौपदीकरणाचे स्वप्न दाखविणाऱ्या प्रशासनाकडून या रस्त्यावरील खड्डे देखील बुजविता येत नसल्याची खंत नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन या रस्त्याचे काम करणार आहे, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.
पैठण-औरंगाबाद रस्ता हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून या रस्त्यावर दोन एमआयडीसी आहेत. पर्यटनाबरोबरच धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून लोक पैठणला येतात. पन्नास किलोमीटरचे अंतर असलेला हा रस्त्यावरून वाहन घेऊन जाताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. कुठेही दिशादर्शक फलक लावलेले नाही. रस्त्यावरील पुलांना काटेरी बाभळींचा विळखा पडलेला आहे. ढोरकीन ते पिंपळवाडी दरम्यानचा रस्ता खड्डेमय झाल्याने पाऊस झाल्यानंतर रस्ते तुडुंब भरले आहेत. त्यामुळे राज्य महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
--
फोटो : पिंपळवाडी पिराची फाट्यावर खड्डे पडले असून, पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबले आहे.
190621\img_20210619_114119.jpg
पिंपळवाडी पिराची फाट्यावर रस्त्याच्या मधोमध प्रमाणात खड्डे झाले पावसाच्या पाण्याने तुंडूब भरले.