लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पाचा प्रश्न नीट हाताळण्याची गरज आहे. याठिकाणी दरवर्षी पाणी येईल, अशी व्यवस्था उभी केली पाहिजे. यासाठी वरच्या धरणांत ६० टक्क्यांवर पाणी साठले, की ते खाली सोडले पाहिजे. ६० टक्के हे प्रमाण कायम ठेवावे. पाणी सोडण्यासाठी आराखडा तयार करणाऱ्यांनी आॅक्टोबरचा विचार केला तो त्रायदायक आहे. पावसाळ्यानंतर पाणी सोडण्यात काहीही अर्थ नसतो, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (दि.२९) येथे केले.दी इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्स (इंडिया)आणि सिंचन सहयोगतर्फे भानुदास चव्हाण सभागृहात ‘जायकवाडी प्रकल्प : सिंचन आणि समन्यायी पाणी वाटप’ या विषयावर आयोजित परिसंवादात उद््घाटक म्हणून हरिभाऊ बागडे बोलत होते. व्यासपीठावर ‘आय.ई.आय’चे अध्यक्ष डॉ. एस.डी. देशमुख, सचिव अशोक ससाणे, सिंचन सहयोगचे अध्यक्ष ई.बी. जोगदंड, सचिव पी.डी. वझे व मिलिंद पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे, प्रा. प्रदीप पुरंदरे, विजयअण्णा बोराडे, डॉ. सर्जेराव ठोंबरे, एस.पी. भर्गोदेव, शंकरराव नागरे, बापू अडकिणे आदींची उपस्थिती होती. हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून परिसंवादाचे उद््घाटन झाले.हरिभाऊ बागडे म्हणाले की, सिंचन आणि समन्यायी पाणीवाटप यामध्ये समन्यायी हा शब्द शेतकºयांसाठी आहे, की राज्यासाठी लागू आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. जायकवाडीतील पाणी व्यवस्थित वापरले जावे. यापुढे मोठी धरणे होणार नाहीत. मध्यम प्रकल्प, पाझर तलावांसाठी जमीन उपलब्ध होऊ शकणार नाही. जलवाहिनीद्वारे शेतापर्यंत पाणी दिले पाहिजे. धरणातील पाणी कधी सोडायचे, याचे गणित बसविले पाहिजे. नाशिक जिल्ह्यांत मराठवाड्यासाठीचे धरण झाले. जायकवाडी गाळाने भरत असल्याने वर पाणी साठविले तर उपयोग होईल, हाच निकष त्यावेळी होता. ही चांगली कल्पना होती; परंतु ज्यांच्या भागात धरण आहे ते पाणी देऊ देत नाही, हा आता प्रश्न आहे. पावसाळ्यातच पाणी सोडले, तर पाणी वाया जात नाही. नदी कोरडी झाल्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाणी सोडले, तर खालच्या धरणात अर्धे पाणीही येण्याची शक्यता नसते, असे हरिभाऊ बागडे म्हणाले.ज्यांच्यासाठी धरण, तेच अडचणीतडॉ. सर्जेराव ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘जायकवाडी प्रकल्प पाणी नियोजन व सद्य:स्थिती’वर परिसंवाद झाला. यावेळी भर्गोदेव म्हणाले की, जायकवाडीत सध्या एकही नियमित अधिकारी नाही. एकेकाकडे चार-चार शाखा आहेत. ६० ते ७० टक्के पदे रिक्त आहेत. जायकवाडीच नव्हे, राज्यभर हेच चित्र आहे. चार वर्षांतून एकदाच पुरेसे पाणी येते. परिणामी, ज्या शेतकºयांसाठी धरण बांधले त्यांचीच अडचण होते. कोणते पीक घ्यावे, याचे नियोजनच करता येत नाही. समन्यायी म्हणजे काय, याचा खेळ सुरू आहे. समस्या एक आणि इलाज दुसराच होत आहे. शंकरराव नागरे म्हणाले की, गाळाच्या नावाखाली धरणांची क्षमता कमी दाखविली जाते. सोडलेल्या पाण्याचा हिशोबच ठेवला जात नाही. त्यामुळे पाण्याची चोरीचा आरोप होतो.... अन् माईकचा पुन्हा ताबालग्नसमारंभात आॅर्केस्ट्रापेक्षा तज्ज्ञांचे व्याख्यान ठेवले पाहिजे, असे बागडे म्हणाले. त्यांच्या मनोगतानंतर, पाणी अडविणे आणि पाणी जिरविण्यासाठी होणाºया कामांमुळे धरणात पाणी येत नसल्याचे सूत्रसंचालकाने म्हटले. यावर बागडेंनी पुन्हा माईकचा ताबा घेत तात्काळ उत्तर दिले.धरणाच्या लाभक्षेत्राच्या बाहेर असलेल्या ८० ते ९० टक्के लोकांचा विचार केला पाहिजे. पाझर तलाव बांधायचे नाहीत, हा समग्र विचार होत नाही. नाही तर मग जायकवाडी धरणातील पाणी सिल्लोडला येऊ द्या, असे बागडे म्हणाले.
६०% वरील पाणी जायकवाडीत सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:02 AM
जायकवाडी प्रकल्पाचा प्रश्न नीट हाताळण्याची गरज आहे. याठिकाणी दरवर्षी पाणी येईल, अशी व्यवस्था उभी केली पाहिजे. यासाठी वरच्या धरणांत ६० टक्क्यांवर पाणी साठले, की ते खाली सोडले पाहिजे. ६० टक्के हे प्रमाण कायम ठेवावे. पाणी सोडण्यासाठी आराखडा तयार करणाऱ्यांनी आॅक्टोबरचा विचार केला तो त्रायदायक आहे. पावसाळ्यानंतर पाणी सोडण्यात काहीही अर्थ नसतो, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (दि.२९) येथे केले.
ठळक मुद्देहरिभाऊ बागडे : ‘सिंचन आणि समन्यायी पाणी वाटप’ परिसंवादात प्रतिपादन