सोमनाथ खताळ , बीडमहाविद्यालयात प्रवेश असताना विद्यार्थी तासीका करीत नाहीत, हे आपण नेहमीच ऐकता. परंतु, प्रवेश नसतानाही नियमीत ‘लेक्चर अटेंड’ करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल ऐकले तर नवल वाटायला नको. बीडमधील काही महाविद्यालयांमध्ये असे प्रकार सर्रास घडत असल्याची धक्कादायक माहिती शुक्रवारी ‘लोकमत’च्या ‘स्टींग’ मधून समोर आली. विशेष म्हणजे हे टवाळखोर विद्यार्थीनींची छेडही काढत असुन महाविद्यालय प्रशासन अनभिज्ञ असल्याचे समोर आले.महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे, अशांनाच ‘लेक्चर’ला बसु द्यावे, त्यांच्याजवळ ओळखपत्र असणे बंधणकारक आहे. परंतु बीडमधील अनेक नामांकीत आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त असलेल्या महाविद्यालयांमध्ये असे काहीच दिसत नाही. बाहेरून येणारे टवाळखोर सर्रासपणे महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये येऊन मुलींची छेड काढून जातात. एवढेच नव्हे तर ओळखीचे प्राध्यापक आणि मित्रांच्या सहकार्याने हेच टवाळखोर लेक्चरही अटेंड करीत असल्याचे दिसून येते. याकडे अनेक प्राध्यापकांचा कानाडोळा असतो. याचाच फायदा घेत गैरप्रकाराला निमंत्रण मिळत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे.तक्रारीसाठी आखडता हात..छेड काढल्यानंतर मुलीही तक्रारीसाठी आखडता हात घेत आहेत. तक्रार द्यायला जावे तर फुकटची दुश्मनी आणि इतर लोक नाव ठेवतात, असे एका विद्यार्थिनीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. महाविद्यालय प्रशासनानेच परिसर आणि वर्गांमध्ये वॉच ठेवण्याची मागणीही त्या विद्यार्थीनीने केली.ओळखपत्र नव्हते...महाविद्यालयाच्या गेटमध्ये प्रवेश करताना जवळपास निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांकडे ओळखपत्रच नव्हते. या विद्यार्थ्यांना ना सुरक्षा रक्षक हटकतात ना प्राध्यापक़ त्यामुळे महाविद्यालयांमध्ये टवाळखोराचां वावर सर्रास वाढला आहे.‘कनिष्ठ’मध्ये संख्या जास्तआकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या बऱ्यापैकी असते. परंतु निम्म्याहून अधिक विद्यार्थी गावाकडच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन बीडच्या महाविद्यालयात आणि शिकवणीत शिक्षण घेतात. परिक्षालाच ते मुळ महाविद्यालयात जातात, हे वास्तव आहे.
फुकटात ‘लेक्चर अटेंड’!
By admin | Published: January 30, 2016 12:02 AM