औरंगाबाद : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे आदेश १६ सप्टेंबर रोजी काढल्याने राज्यातील तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. आता या निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये मतदार याद्या अंतिम झाल्यानंतर होण्याची शक्यता आहे. राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागा ५ डिसेंबर रोजी रिक्त होत आहेत. या रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्या नव्याने तयार करण्याचे आदेश काढले आहेत. १ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०१६ दरम्यान मतदार नावनोंदणीचे अर्ज स्वीकारले जातील. २३ नोव्हेंबर प्रारूप मतदार याद्या तयार करून त्या प्रसिद्ध करण्यात येतील. ८ डिसेंबरपर्यंत हरकती स्वीकारण्यात येतील. २६ डिसेंबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल देण्यात येईल. ३० रोजी अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.
विधान परिषदेची निवडणूक लांबणार
By admin | Published: September 20, 2016 12:18 AM