उंडणगाव : शिवारातील काटोन भागात एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करीत बिबट्याने फडशा पाडला आहे. या घटनेने शेतकरी, पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याला पिंजरा लावून पकडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे.
शेतकरी सुभाष लक्ष्मण बोराडे यांची काटोन भागातील गट नंबर ७०९ मध्ये शेती आहे. त्यांनी शेतशिवारात जनावरांसाठी गोठा उभारला आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी त्यांनी दोन बैल, एक गाय, वासरू गोठ्यात बांधून ते गावात गेले. ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री बिबट्याने या गोठ्यावर हल्ला करीत गोठ्यातील वासराचा फडशा पाडला. ही घटना शुक्रवारी (दि.१०) सकाळी उघडकीस आली. बिबट्याने हल्ला केल्याने बोराडे यांचे किमान पंधरा ते वीस हजारांचे नुकसान झाले आहे. वननिभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर येथे बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले आहेत. अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी एन. जे. सोनवणे, वनपाल सय्यद हफिज, वनरक्षक एस. एम. सागरे, वनमजूर शेख फकीरा यांनी पंचनामा केला. शेतकऱ्यास नुकसानभरपाई देण्याची मागणी येथील नागरिकांनी वनविभागाकडे केली.
-----
शेतकरी धास्तावले
उंडणगाव शिवाराच्या रानावनात गुरे, शेळ्या, मेंढपाळ व पशुपालक शेतकरी मोठय़ा प्रमाणावर धास्तावलेले आहेत. लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली.
------
फोटो : उंडणगाव शिवारात बिबट्याने हल्ला करून एक वासराचा फडशा पाडला आहे, तर बिबट्याच्या पायाचे ठसे स्पष्ट दिसत आहे.
110921\img-20210910-wa0039.jpg
उंडणगाव येथे बिबट्याने हल्ला करीत एका वासराचा फडशा पाडला आहे. त्या बिबट्याच्या पायाचे ठसे स्पष्ट दिसत आहे.