शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

रावेर शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार; प्रसंगावधान राखून झाडावर चढल्याने शेतकरी बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 6:36 PM

वन्य प्राण्यांच्या कोणताही अधिवास आढळून आल्यास शेतकऱ्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोयगाव : शेतातच चरण्यासाठी सोडलेल्या शेळ्या पाहून ज्वारीच्या शेतात लपलेला बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र यावेळी बिबट्याला रानडुक्कर समजून शेळ्यांची सुटका करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला झाडावर चढून जीव वाचवावा लागल्याची घटना गुरुवारी दुपारी तालुक्यातील रावेरी शिवारात गुरुवारी दुपारी घडली.

रावेरी(ता.सोयगाव)शिवारात शेतकरी कैलास राजाराम मोरे हे ज्वारीच्या पिकांची राखण करत असताना शेळ्यांना चरण्यासाठी सोडले होते.अचानक ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. यावेळी बांधावर उभ्या असलेल्या मोरेंना  रानडुक्कर असल्याचा भास झाला आणि ते पुढे गेले. मात्र चवताळलेल्या बिबट्याने डरकाळी फोडताच शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून जवळच्या बांधावर असलेल्या झाडावर चढत आपला जीव वाचवला.

दरम्यान, बिबट्याने एका शेळीची शिकार करून दुसरीस गंभीर जखमी केले. यावेळी मोरे यांनी झाडावरून मदतीसाठी आरडाओरडा केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व  बिबट्याला लाठ्याकाठ्यांच्या सहाय्याने हुसकावून लावले. यानंतर मोरे यांना शेतकऱ्यांनी खाली उतरवले. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक भिका पाटील,वनमजूर गोविंदा गांगुर्डे, अमृत राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा करून बिबट्याचे ठसे घेतले आहे.पाणी पिण्याच्या हेतूने जंगलातील हा बिबट्या शेतात आला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला असून शेती शिवारात शेतकऱ्यांनी एकटे फिरू नये,तसेच गटागटाने शेतात काम करावे,असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांनी केले आहे. वन्य प्राण्यांच्या कोणताही अधिवास आढळून आल्यास शेतकऱ्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरीforestजंगल