शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

४ हजार शिक्षकांना दिले ‘प्रगत’चे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:47 AM

: तालुक्यातील तरोडा येथील देवीदास गुंजकर या अवलिया शिक्षकाने १६० कार्यशाळेद्वारे ४ हजारांच्यावर शिक्षकांना प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ या उपक्रमाचे धडे दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्यातील तरोडा येथील देवीदास गुंजकर या अवलिया शिक्षकाने १६० कार्यशाळेद्वारे ४ हजारांच्यावर शिक्षकांना प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ या उपक्रमाचे धडे दिले आहेत.तरोडा येथील शाळा द्विशिक्षकी आहे. येथे पहिली ते चौथी १०० टक्के प्रगत आहे. ज्ञानरचनावाद शैक्षणिक साहित्याचा अध्यापनात वापर कृतीयुक्त अध्यापन पाठाचे उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थी प्रगत करण्याचे ध्येय आदीमुळे तरोडा येथील सर्व विद्यार्थी प्रगत आहेत. या शाळेला हिंगोली जिल्ह्यासह यवतमाळ, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यातील शिक्षकांनी या शाळेला भेटी दिल्या. या भेटीदरम्यान विद्यार्थी प्रगत कसे करायचे. याबाबत गुंजकर यांनी ४ हजारांच्या जवळपास शिक्षकांनी मार्गदर्शन केले.गुंजकर यांनी १६० कार्यशाळांतून शिक्षकांना प्रगतचे धडे दिले. उन्हाळ्याच्या सुट्यानंतरही गुंजकर यांनी विद्यार्थ्यांची शाळा भरवत त्यांना अध्यापन केले. ज्ञानरचनावादाचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून गुंजकर यांनी विद्यार्थ्यांना अध्यापन केले. मागील दोन वर्षांपासून तरोडा येथील शाळा १०० टक्के प्रगत आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी त्यांनी शिक्षण दिले. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना दृढ झाल्या आहेत. ही शाळा शैक्षणिक साहित्यांनी गजबजली आहे. सर्व विषयात विद्यार्थ्यांची आघाडी आहे. अनेक अधिकाºयांनी या शाळेला भेट दिली. गुणवत्ता पाहून सर्वांनीच गुंजकर यांचे कौतुक केले.गुंजकर यांचे प्रगतबद्दलचे योगदान पाहता अनेक संस्था व जि.प.ने आदर्श शिक्षक हा पुरस्कार दिला. नुकताच राज्य पातळीवरील शिक्षकतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी तरोडा शाळेला भेट दिली. त्यांनी या शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले. त्यांनी अभिप्रायात लिहिले की, विद्यार्थ्यांना प्रगत करणारा, आत्मविश्वास जागवणारा, स्वयंप्रेरणेने काम करणाºया शिक्षकाला माझा सलाम.