लोकमत न्यूज नेटवर्कगल्ले बोरगाव : येथील जि.प. शाळेची दहावीपर्यंत शाळा असून येथील शिक्षक नेहमीच उशिरा शाळेत येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सोमवारी तर कहरच झाला. मुख्याध्यापकाच्या मुलाचे लग्न असल्याने सर्व शिक्षक या सोहळ्यासाठी गेल्याने शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशद्वार बंद असल्याने रस्त्यावर हिंडावे लागले.मुख्याध्यापक आर. झेड. पाटील यांच्या मुलाचे ५ फेब्रुवारी रोजी लग्न असल्याने पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी देण्यात आली होती.परंतु चौथीपर्यंतच्या शाळेला सुटी नसल्याने नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेत आले. परंतु गुरुजीच न आल्याने प्रवेशद्वार बंद होते. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर फिरत होते.यावेळी सरपंच शोभाताई खोसरे यांनीही याबाबतीत नाराजी व्यक्त करुन संबंधित अधिकाºयांकडे शाळा सुधारण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक व शिक्षक रोज अप-डाऊन करत असल्याने शाळेची वाट लागली आहे.शाळेची वेळ सकाळी ९.४०ची आहे, परंतु १०. ३० वाजले तरी शिक्षक आले नाही. विद्यार्थी रस्त्यावर फिरत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षकांची वाट पाहिली. बºयाच वेळाने शिक्षक आले आणि त्यांनी ग्रामस्थांना पाहून चावीचा शोध सुरु केला.च्तोपर्यंत अर्धे विद्यार्थी घरी गेले होते. यावेळी ग्रामस्थांनी शिक्षकांना विचारपूस केली. मुख्याध्यापक नंदलाल कापुरे हेच शाळेत वेळेवर येत नाही तर शिक्षक कसे वेळेवर येणार, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकल शिक्षकांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने सर्वच गुरुजी उशिरा येत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.च्त्यामुळे दोन्ही मुख्याध्यापकांची बदली करण्यात यावी, अशी संतप्त मागणी गावकºयांनी केली आहे. यावेळी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोसरे, ग्रा.पं. सदस्य विशाल खोसरे, राजू हारदे, अमोल भोजने, गुलाब भागवत, सुभाष चव्हाण, आप्पा मत्ते, शाम कडीर्ले, संतोष औटे, मनोज हारदे, उपसरपंच संजय भागवत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
‘लेट लतीफ’ शिक्षकांमुळे गल्ले बोरगाव जि.प. शाळेचे विद्यार्थी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:48 AM