औरंगाबाद : आपल्या पूर्वजांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य दिले आता आपण मराठवाड्याला समृद्धी व विकास देऊ. मराठवाड्याला मागासालेपणापासून मुक्ती देण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे असा शुभेच्छापर संदेश मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी आज ७० व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिम्मित दिला.
सिद्धार्थ उद्यान येथील ''स्मृती स्तंभा''स आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिवादन केले. यानंतर त्यांनी जनतेस मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी वॉटर ग्रीडला मंजुरी देण्यात आली असून हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा आणि अत्याधुनिक आहे असे यावेळी स्पष्ट केले. तसेच औरंगाबाद या ऐतिहासिक शहराच्या विकासासाठी विविध योजना आणि निधीची उपलब्धता करण्यात येईल असे आश्वासन दिले.
मराठवाड्याला मागासलेपणापासून मुक्ती देऊ आपल्या पूर्वजांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य दिले, आता आपण मराठवाड्याला समृद्धी आणि विकास देऊ. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त मराठवाड्याला मागासालेपणापासून मुक्ती देण्याचे कार्य करू असेही मुख्यमत्री यावेळी म्हणाले.