शैलेश सरांच्या E4E क्लासेसच्या यशाचा आलेख आज सातत्याने उंचावत आहे. सर्वात तरुण वयातील सर्वोत्तम 'मॅथ्स गुरू' म्हणून शैलेश सर ओळखले जातातच, पण त्यासोबतच विद्यार्थ्यांचा मोठा भाऊ, मित्र आणि मेंटॉर म्हणून समजून घेण्यातही शैलेश यांचा हातखंडा आहे. हाच धागा पकडून सीएनएक्स टीमने शैलेश यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि १२ वी मॅथ्स, जेईई यासोबतच अभियांत्रिकीच्या इतर स्पर्धा परीक्षांची तयारी, गणिताचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, याविषयी संवाद साधला.
चौकट :
गणिताकडे दुर्लक्ष मुळीच नको
गणिताचे महत्त्व सांगताना मॅथ्स गुरू शैलेश सर म्हणाले की, इंजिनिअरिंगची स्पर्धा परीक्षा आणि इंजिनिअरिंगची चार वर्षे या संपूर्ण अभ्यासक्रमाचा पाया गणित आहे. त्यामुळे जर इंजिनिअर बनण्याचे ध्येय असेल तर अगदी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी गणिताकडे लक्ष दिले पाहिजे. याशिवाय फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांचा गाभाही नकळतपणे गणिताशी जोडलेला आहे. त्यामुळे गणिताकडे दुर्लक्ष तर नकोच, पण घोकंमपट्टी करण्यापेक्षा संकल्पना समजून घेऊन गणिताशी मैत्री करा, असे शैलेश सरांनी सांगितले.
चौकट :
E4E क्लासचे वेगळेपण
वेळ सुरू झाली की शिकविले आणि वेळ संपल्यावर शिकविणे थांबविले, अशी पारंपरिक पद्धत E4E क्लासेसमध्ये कधीच अवलंबिली जात नाही. त्यामुळेच तर E4E क्लास इतरांपेक्षा वेगळा ठरतो. याविषयी सांगताना शैलेश सर म्हणाले, क्लासमध्ये शिकविणे, अभ्यास देणे, सराव करणे हे सर्व तर होतच असते, पण त्यासोबच विद्यार्थ्यांशी मैत्रिपूर्ण नाते निर्माण करून त्यांच्याशी संवाद साधणे, गुण कमी मिळाले तर वर्गात सर्वांसमोर न बोलता वैयक्तिकपणे संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर करणे, मुलांना रागावून अभ्यास करायला लावण्यापेक्षा गोड बोलून अभ्यासाची आवड निर्माण करणे, फोनच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपर्कात राहणे, मुलांची तयारी आणि त्यांचा अभ्यास पाहून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी अवलंबविणे, विद्यार्थ्यांना काय येते, यापेक्षा काय येत नाही, याकडे लक्ष देणे अशा काही महत्त्वपूर्ण बाबींमुळे E4E क्लास आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
चौकट :
विद्यार्थ्यांनो वेळीच सावध व्हा
- आजकाल आयआयटी, जेईई या परीक्षांचे विद्यार्थ्यांमध्ये जणू काही फॅड आहे. या परीक्षांची तयारी करण्यात काहीही गैर नाही, पण प्रत्येक विद्यार्थ्याने त्याची आकलनशक्ती लक्षात घ्यावी. अनेकदा विद्यार्थी आयआयटी, जेईई या परीक्षांची तयारी करताना राज्यस्तरावर असणाऱ्या प्रवेश परीक्षांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ते ना आयआयटीला पात्र ठरतात, ना राज्यस्तरावरील प्रवेश परीक्षेत अपेक्षित यश मिळवू शकतात. त्यामुळेच शैलेश यांनी विद्यार्थ्यांना वेळीच सावध होण्याचा इशाराही दिला आहे.
- तसेच मित्र इंजिनिअरिंग करत आहेत, म्हणून जर कोणी इंजिनिअरिंगला प्रवेश घेत असेल तर तसेही करू नका. ११ वी, १२ वीमध्ये मेडिकलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा काही कारणास्तव इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यावा लागतो, तेव्हा त्यांना इंजिनिअरिंग खूप अवघड जाते. कारण, बारावीपर्यंत त्यांनी गणिताकडे दुर्लक्ष केलेले असते. त्यामुळे ११ वी मध्येच योग्य निर्णय घेऊन तयारी करा, असेही शैलेश सरांनी सुचविले.
चौकट :
अधिक सराव, अधिक यश
'जेवढा जास्त सराव, तेवढे मोठे यश' हा एकच कानमंत्र शैलेश सरांनी जेईई किंवा इतर कोणत्याही परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविण्यासाठी सांगितला आहे. त्यामुळेच लवकरच अभ्यासक्रम संपवून विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ सराव करण्यासाठी कसा मिळू शकेल, याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. E4E क्लासेसमध्ये १२ वी असो किंवा स्पर्धा परीक्षा असो, अभ्यासक्रम परीक्षेच्या जवळपास १ वर्ष आधीच संपलेला असतो आणि त्यानंतर सराव करणे, प्रश्नसंच सोडविणे यावर भर दिला जातो. यामुळे जेईई ॲडव्हान्ससह मेन्स, बीटसॅट, एनडीए, खाजगी विद्यापीठांच्या परीक्षा, एमएचटीसीईटी, विविध राज्यांच्या सीईटी अशा प्रत्येक परीक्षेच्या तयारीसाठीच विद्यार्थ्यांना भरपूर वेळ मिळतो.
चौकट :
विद्यार्थ्यांशी संवाद महत्त्वाचा
१२ वीचा विद्यार्थी हा किशोरवयीन असतो. ना धड मोठा ना धड लहान. या वयात होणाऱ्या शारीरिक, मानसिक बदलांमुळे आणि त्यासोबतच असणाऱ्या अभ्यासाच्या दडपणामुळे विद्यार्थी भांबावून जातात. त्यांच्या अडचणी ते पालकांना सांगू शकत नाहीत आणि त्यांचेच समवयस्क मित्र त्यांना या अडचणींवर तोडगा देऊ शकत नाहीत. त्यामुळे या वयातील मुलांना आज मोठ्या प्रमाणावर नैराश्य येत आहे आणि त्याचा परिणाम अभ्यासावर होतो. म्हणूनच, जे काम करण्यात पालक कमी पडत आहेत, ते काम आज शैलेश सर करत आहेत. याचाही खूप चांगला परिणाम मुलांच्या निकालावर होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. तसेच पालकांनीही शैलेश सरांची ही भूमिका स्तुत्य असल्याचे सांगितले आहे.
चौकट :
E4E क्लासेसची वैशिष्ट्ये-
- प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष
- हसत- खेळत गणित शिकविण्यावर भर
- ढोर मेहनतीपेक्षा स्मार्ट वर्कचे तंत्र
- वेळ वाचविण्यासाठी अनेक शॉर्टकट ट्रिक्स
- वेळोवेळी मिळणारे प्रोत्साहन
- शैक्षणिक प्रगतीसोबतच व्यक्तिमत्त्व विकास
- प्रत्येक आठवड्याला सराव परीक्षा
चौकट :
८ फेब्रुवारीपासून नवी बॅच
२०२२ मध्ये जेईईची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ८ फेब्रुवारी रोजी नवी बॅच सुरू होत आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी.