शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कर्ज घेऊ पण जायकवाडीच्या कालव्याची दुरुस्ती करू : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 7:20 PM

जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी. आणि डावा कालवा २०८ कि.मी.चा आहे. या कालव्यांची अवस्था खराब झालेली आहे.

औरंगाबाद : जायकवाडीचे ( Jayakwadi Dam ) दोन्ही कालवे दुरस्त करण्यासाठी ३ हजार कोटींपर्यंत खर्च आला तरी चालेल. जागतिक बँकेकडून कर्ज घेऊ, परंतु दोन्ही कालवे आधुनिक पध्दतीने बांधू, असा विश्वास व्यक्त करीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी पाणीपट्टीचे प्रमाण वाढविण्याच्या आणि पाणीवाटपात पारदर्शकपणा आणण्याच्या सूचना रविवारी संबंधित यंत्रणेला केल्या. ते एमजीएम येथील कार्यक्रमात बोलत होते.

जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी. आणि डावा कालवा २०८ कि.मी.चा आहे. या कालव्यांची अवस्था खराब झालेली आहे. अनेक ठिकाणची पाणी वितरण परिस्थिती वाईट झालेली आहे. जायकवाडी धरणाचे दोन्ही कालवे अत्याधुनिक करणे, आहे ती गळती बंद करणे, त्याला आधुनिक स्वरूप देणे, पाणी वाटप पारदर्शक करण्यासाठी सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. दोन्ही कालव्यांचे सर्वेक्षण करून आधुनिक पद्धतीने हे काम होणार आहे. परंतु वापरलेल्या पाण्याची पट्टी येणेदेखील गरजेचे आहे. फक्त १६ टक्के पाणीपट्टी वसुली होत आहे. जायकवाडी धरण निम्म्यावर येते, तरी वसुली होत नाही. पाणीवाटप कार्यक्षमतेने होते, तसेच वसुलीदेखील व्हावी. कालवे दुरुस्त होईपर्यंत पाणी वाटपात पारदर्शीपणा आणावा लागेल.

‘ब्रम्हगव्हाण’ ला मान्यता देणारदोन आठवड्यात मंत्रिमंडळासमोर जाईल. सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव जाणे गरजेचे आहे. असे पाटील म्हणाले. १ हजार कोटींची सुधारीत मान्यता ब्रम्हगव्हाणसाठी असणार आहे. असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले.

५० टक्क्यांपेक्षा कमी सिंचनजायकवाडीच्या कालव्यांना गळती लागल्यामुळे ५० टक्के पाणी सिंचनाला मिळते आहे. ३२०० क्युसेसची कालव्यांची क्षमता आहे. १२०० क्युसेस पाणीदेखील त्यातून शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाही. दरवर्षी १०० ते ५० कोटी डागडुजीला देऊन वेळ मारून नेली जाते. असे करीत राहिलो तर ५० वर्षांतही कालवे दुरुस्त होणार नाही, असे आ. सतीश चव्हाण प्रास्ताविकात म्हणाले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणJayant Patilजयंत पाटीलAurangabadऔरंगाबाद