शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

एलआयसीच्या कारकु नाकडून साडेदहा लाखांचा अपहार

By admin | Published: July 01, 2016 12:27 AM

औरंगाबाद : तारण पॉलिसीवर परस्पर कर्ज उचलून घेऊन एलआयसीमधील एका कारकुनानेच तब्बल १० लाख ४९ हजार ५८४ रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे

औरंगाबाद : तारण पॉलिसीवर परस्पर कर्ज उचलून घेऊन एलआयसीमधील एका कारकुनानेच तब्बल १० लाख ४९ हजार ५८४ रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पारदर्शक काम करणाऱ्या एलआयसीच्याच कारकुनाने हा अपहार केल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल जोशी असे आरोपीचे नाव आहे. पुंडलिकनगर रोडवरील रामदास टॉवर येथील ९८ जी या शाखेत जोशी उच्चश्रेणी लिपिक पदावर कार्यरत आहे. एलआयसीच्या ज्या पॉलिसीधारकांनी एलआयसी हौसिंग फायनान्सकडून कर्ज घेतले आणि कर्जाची परतफेड केल्यानंतर जे पॉलिसीधारक तारण उतरवण्याचे विसरले आहेत, अशा पॉलिसीधारकांना आरोपीने शोधून काढले. अशा पॉलिसीधारकांच्या नावे त्याने परस्पर कर्ज घेतले आणि ही रक्कम त्याने स्वत:च्या बँक खात्यात जमा करून घेतली. या प्रकरणाची माहिती एका ग्राहकास समजली, तेव्हा त्याने शाखा व्यवस्थापकास माहिती दिली. व्यवस्थापकाने चौकशी केली. जोशी याने अनेक पॉलिसीवर कर्ज उचलून अपहार केल्याचे त्यांना समजले. प्रकरण पोलीस आयुक्तांपर्यंत गेले. आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना दिले. साबळे आणि सहायक निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, पोहेकॉ विलास कुलकर्णी, विठ्ठल फरताळे, भागवत सुरवाडे, मनोज उईके, प्रकाश काळे, महेश उगले, सचिन संपाळ, दादासाहेब झारगड यांनी चौकशी केली.