जालना : मोरंडी मोहल्ला भागातील गणेश लक्ष्मण येवले खून प्रकरणी छगन उर्फ ऋषी रामा जाधव यास तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.पी. कापुरे यांनी जन्मठेप व पाच हजाराची दंडाची शिक्षा बुधवारी ठोठावली आहे.देवीचे वर्गणीच्या जमा झालेल्या पैशांच्या वादातून गणेश येवले यास २९ नोव्हेंबर २०१३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मोरंडी मोहल्ला भागात तलवार व चाकुने जबर मारहाण करण्यात आली होती. दवाखान्यात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी छगन उर्फ ऋषी रामा जाधव, रामा जाधव, ज्योती जाधव, राणी जाधव विरूद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपी छगन जाधव यास जन्मठेपेची व आरोपी रामा जाधव, ज्योती जाधव, राणी जाधव यांना कलम ३२३ नुसार एक वर्ष व प्रत्येकी पाचशे रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. (प्रतिनिधी)
खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
By admin | Published: August 18, 2016 12:42 AM