शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

सुनेला जाळल्याप्रकरणी सासूला जन्मठेपेची शिक्षा

By admin | Published: July 29, 2015 12:16 AM

अंबाजोगाई : क्षुल्लक कारणावरून सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन ठार मारल्याप्रकरणी त्या महिलेची सासू विजयाबाई देशमुख हिला

अंबाजोगाई : क्षुल्लक कारणावरून सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन ठार मारल्याप्रकरणी त्या महिलेची सासू विजयाबाई देशमुख हिला अंबाजोगाई येथील तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शहरातील खडकपुरा परिसरातील राजेश संभाजी देशमुख याचा विवाह सारिका हिच्यासोबत झाला होता. लग्नानंतर सारिका हिला कुटुंबात शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. ६ एप्रिल २०१० रोजी सायंकाळी ८ वाजता सारिका घरात जेवण करतांना तिची सासू विजयाबाई देशमुख हिने, तू सकाळी चांदीचा करंडा का घेतला होतास? या कारणावरून भांडण करीत तिच्या अंगावर रॉकेल टाकून मेणबत्तीने पेटवून दिले. यात सारिका गंभीर भाजल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना सारिका हिचा मृत्यूपूर्व जबाब घेण्यात आला होता. त्या जबाबानुसार पती राजेश देशमुख, सासू विजयाबाई देशमुख, सासरा संभाजी देशमुख यांच्याविरुद्ध शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. उपचार सुरू असताना १० एप्रिल रोजी सारिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीविरुद्ध कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास तत्कालिन उपअधीक्षक स्वाती भोर, फौजदार डी. बी. चिखलीकर यांनी केला व आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरील प्रकरण सुनावणीसाठी येथील तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयासमोर आले. सरकारी वकील डी. व्ही. चौधरी यांनी याप्रकरणी आठ साक्षीदार तपासले. मृत्यूपूर्व जबाब व आरोपीविरुद्धचे ठोस पुरावे ग्राह्य धरून हांडे यांनी सासू विजयाबाई संभाजी देशमुख हिला दोषी ठरवून कलम ३०२ भादंवि अन्वये जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी पंधरा दिवसांची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने चौधरी यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. आर. एस. सापते, अ‍ॅड. विकास काकडे, अ‍ॅड. सचिन चौधरी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)