याबाबत मृत शिल्पाचा भाऊ ज्ञानेश्वर मुकुंदा गायकवाड याने वाळूज एमआयडीसी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली हाेती की, सदर घटना २१ फेब्रुवारी २०१७ च्या मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास घडली होती. आराेपी दीपक जाेगदंड हा सतत शिल्पाच्या चारित्र्यावर संशय घेत असे. या दाेघांचा विवाह घटनेच्या ५ वर्षांपूर्वी झाला हाेता. त्यांना श्रावणी (४) व शिवकन्या (२) अशा दाेन मुली आहेत. या दाेन्ही मुलींना घेऊन नातेवाईक मुलाला बाहेर जाण्यास सांगितले व नंतर चारित्र्याच्या संशयावरून दीपकने शिल्पाचा गळा दाबून खून केला होता.
फिर्यादी व आराेपी हे वाळूज एमआयडीसी भागातील वडगाव काेल्हाटी येथील सलामपुरे नगर भागात राहात हाेते. काही अंतरावर दीपकचे आई-वडीलही राहात हाेते. दीपक मूळचा पूर्णा (जि. परभणी) येथील रहिवासी असून, ताे येथे बिगारी काम करत होता .
खटल्याच्या सुनावणी वेळी सहायक लाेकअभियाेक्ता अनिल हिवराळे यांनी १० साक्षीदारांचे जबाब नाेंदवले. यामध्ये डाॅक्टर, फिर्यादीची साक्ष व वैद्यकीय अहवाल महत्त्वाचा ठरला. जबाब व पुराव्याच्या आधारे न्यायालयाने भादंवि कलम ३०२ नुसार दीपक जाेगदंड याला दाेषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आराेपी दीपक अटकेपासून खटल्याचा निकाल लागेपर्यंत कारागृहातच आहे.