मुजीब देवणीकर/शेख महेमूद । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद/ वाळूज महानगर : ऐतिहासिक औरंगाबाद शहरापासून अवघ्या २४ किलोमीटर अंतरावरील लिंबेजळगाव येथे शुक्रवारपासून राज्यस्तरीय इज्तेमाला सुरुवात होत आहे. लाखो भाविक या भव्य सोहळ्याला हजेरी लावणार असून, यासाठी युद्धपातळीवर असंख्य सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तब्बल दोन हजार एकरवर जणू काही एक नवीन शहरच वसविण्यात आल्याची प्रचीती या इज्तेमानिमित्त येत असून, संयोजन समितीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इज्तेमाच्या वैभवात भरच टाकली आहे. समितीसह येथे अनेक दिवसांपासून श्रमदान करणाºया हजारो नागरिकांचे काम थक्ककरणारे आहे.औरंगाबाद शहराला तब्लिगी जमातच्या राज्यस्तरीय इज्तेमाचे संयोजनपद पहिल्यांदाच मिळाले आहे. २० वर्षांपूर्वी धुळे येथील राज्यस्तरीय इज्तेमा आजही औरंगाबादकर विसरू शकलेले नाहीत. शुक्रवार २४ फेबु्रवारीपासून सुरू होणाºया या सोहळ्याच्या निमित्ताने आतापासून हजारोंच्या संख्येने राज्यभरातील भाविक दाखल होत आहेत. शुक्रवारी दुपारी विशेष नमाज अदा करण्यासाठी येथे जनसागर उसळणार हे निश्चित.राष्टÑीय एकात्मतेचा संदेशइज्तेमासाठी मागील चार महिन्यांपासून हजारो मुस्लिम बांधव याठिकाणी विविध सुविधा पुरविण्यासाठी श्रमदान करीत आहेत. इज्तेमासाठी शेकडो हिंदू-मुस्लिम व इतर समाजबांधवांनी आपल्या जमिनी स्वखुशीने देऊन राष्टÑीय एकात्मा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.९० लाख चौरस फुटांचा मुख्य सभामंडपइज्तेमासाठी जवळपास ९० लाख चौरस फुटांचा भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. या शामियान्यात एकाच वेळी ७ ते ८ लाख भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली असून, याठिकाणी सामूहिक नमाज पठण, प्रमुख उलेमांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी उच्च कोटीची ध्वनिव्यवस्था संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.पाच हजार ट्रॅफिक स्वयंसेवकया इज्तेमास्थळी लाईट, पाणी, रुग्णालये, हॉटेल, जनरेटर, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब आदींची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या इज्तेमात देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक वाहनातून येणार असून, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांच्या मदतीसाठी ५ हजार स्वयंसेवक रस्त्यावर तैनात ठेवण्यात आले आहेत. या स्वयंसेवकांना जॅकेट, शिट्याही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.इज्तेमासाठीपाच विशेष रेल्वेऔरंगाबाद शहरापासून २४ किलोमीटर अंतरावरील लिंबेजळगाव येथे आयोजित इज्तेमासाठी रेल्वे प्रशासनाकडून गुलबर्गा-औरंगाबाद - गुलबर्गा आणि सीएसटी मुंबई - औरंगाबाद - सीएसटी मुंबई यासह पाच विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहेत. तसेच एसटी महामंडळातर्फे जादा बसचे नियोजन केले आहे.गुलबर्गा-औरंगाबाद ही रेल्वे गुलबर्गा येथून २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.५५ वाजता सुटेल. सोलापूर, लातूर, परभणी मार्गे ही रेल्वे २४फेब्रुवारीला पहाटे ४ वाजता औरंगाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे औरंगाबादहून २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुटेल आणि २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता गुलबर्गा येथे पोहोचेल.सीएसटी मुंबई-औरंगाबाद ही रेल्वे सीएसटी मुंबई येथून शुक्रवारी मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल. मनमाड मार्गे ही रेल्वे २४ फेब्रुवारीला सकाळी ८.३० वाजता औरंगाबादला पोहोचेल.परतीच्या प्रवासात ही रेल्वे औरंगाबादहून २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.५० वाजता सुटेल आणि सीएसटी मुंबई येथे २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.२० वाजता पोहोचेल.७२ जादा बसगाड्याएसटी महामंडळातर्फे २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान लिंबेजळगावसाठी दररोज ७२ बस सोडण्यात येणार आहेत. हर्सूल, चिकलठाणा, शहागंज, रेल्वेस्टेशन, देवळाई चौक, मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकातून जादा बस सोडण्यात येणार आहेत असे, विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार यांनी दिली.भोकर-औरंगाबाद-भोकर रेल्वेभोकर-औरंगाबाद ही रेल्वे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भोकर येथून सकाळी ६ वाजता सुटेल आणि सकाळी ११.२० वाजता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर दाखल होईल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे औरंगाबादहून २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.४५ वाजता सुटेल आणि रात्री ९.५० वाजता भोकर येथे पोहोचेल. याबरोबरच २६ फेब्रुवारीला औरंगाबाद- आदिलाबाद ही रेल्वे औरंगाबादहून दुपारी १.५५ वाजता सुटेल.
लिंबेजळगाव : राज्यस्तरीय इज्तेमा उद्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:00 AM
ऐतिहासिक औरंगाबाद शहरापासून अवघ्या २४ किलोमीटर अंतरावरील लिंबेजळगाव येथे शुक्रवारपासून राज्यस्तरीय इज्तेमाला सुरुवात होत आहे. लाखो भाविक या भव्य सोहळ्याला हजेरी लावणार असून, यासाठी युद्धपातळीवर असंख्य सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देतीन दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रम, देश-विदेशातूनही भाविक येणार