लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी लिंगायत धर्माला मान्यता होती; परंतु स्वातंत्र्यानंतर जनगणनेत हिंदूतील एक जात म्हणून लिंगायतची नोंद झाली. धर्ममान्यताच काढून टाकण्यात आली; परंतु लिंगायत हिंदूतील जात नसून हा एक स्वतंत्र आणि परिपूर्ण धर्म आहे. त्यामुळे लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळविण्यासाठी संघर्ष सुरू आहे, असे जगद््गुरू चन्नबसवानंद महास्वामी (दिल्ली) म्हणाले.लिंगायत धर्म महामोर्चा विभागीय प्रचार कार्यालयाचे शनिवारी (दि. ३) महात्मा बसवेश्वर चौक (आकाशवाणी चौक) येथे उद््घाटन झाले. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी औरंगाबादेत ८ एप्रिल रोजी सकाळी १० वा. क्रांतीचौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मराठवाडा विभागीय लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत चन्नबसवानंद महास्वामी म्हणाले, विश्वगुरू महात्मा बसवेश्वर हे लिंगायत धर्माचे संस्थापक आहे. या धर्माला ९०० वर्षांचा इतिहास आहे; परंतु यापेक्षा कमी कालावधीचा इतिहास असलेल्यांना स्वतंत्र धर्माची मान्यता मिळाली आहे. भारत स्वातंत्र्यानंतर लिंगायत धर्म एक प्रकारे पारतंत्र्यात गेला. स्वतंत्र धर्माच्या मान्यतेसाठी कर्नाटकमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या समितीने लिंगायत स्वतंत्र धर्म असल्याचा अहवाल दिला आहे. महाराष्ट्र सरकारनेही अहवाल तयार करून स्वतंत्र धर्माच्या मान्यतेसाठी केंद्र सरकारला शिफारस के ली पाहिजे,असे चन्नबसवानंद महास्वामी म्हणाले.याप्रसंगी तेलंगणा येथील समन्वय समितीचे अशोक मुस्तापुरे, अविनाश भोसीकर, बाबासाहेब कोरे, प्रा. राजेश विभुते, बसवराज मंगरूळे, नगरसेविका शोभा बुरांडे, डॉ. आशा साकोळकर, डॉ. अमरनाथ सोलपुरे, जिल्हा समन्वयक प्रदीप बुरांडे, वीरभद्र गादगे, सचिन संगशेट्टी, आत्माराम पाटील, राजेश कोठाळे, गणेश वैध, गोविंद डांगे, अभिजित घेवारे, प्रा. विजय पाटील, उद्धव करडखेले, वीरभद्र गाजेवार, शिवा गुळवे, महेश मोघे, अमित महाजन, अभिषेक वडगावकर, लक्ष्मणअप्पा मुपडे, बसवराज खानापुरे, सचिन पांडे, भीमाशंकर साखरे, शेखर कोटुळे, शिवप्रभू ज्ञाने, दीपक उरगुंडे आदी उपस्थित होते.
लिंगायत स्वतंत्र आणि परिपूर्ण धर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:21 AM
देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी लिंगायत धर्माला मान्यता होती; परंतु स्वातंत्र्यानंतर जनगणनेत हिंदूतील एक जात म्हणून लिंगायतची नोंद झाली. धर्ममान्यताच काढून टाकण्यात आली; परंतु लिंगायत हिंदूतील जात नसून हा एक स्वतंत्र आणि परिपूर्ण धर्म आहे. त्यामुळे लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळविण्यासाठी संघर्ष सुरू आहे, असे जगद््गुरू चन्नबसवानंद महास्वामी (दिल्ली) म्हणाले.
ठळक मुद्देजगद््गुरू चन्नबसवानंद महास्वामी : लिंगायत धर्म महामोर्चा विभागीय प्रचार कार्यालयाचे उद््घाटन