औरंगाबाद - लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी औरंगाबादेत आज क्रांतीचौकातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मराठवाडा विभागीय लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार आहे. महामोर्चासाठी मराठवाड्यासह लगतच्या भागातून मोठ्या संख्येने लिंगायत शहरात दाखल होत आहेत.सकाळपासून शहराच्या चोहोबाजूनी लिंगायत महामोर्चा, मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत अशा घोषणा असलेल्या भगव्या टोप्या परिधान करुन हातातला झेंडा उंचावत समाजाचे जथ्थे मोर्चाच्या मार्गावर येत आहेत. क्रांतीचौक, पैठणगेट, सिटी चौकमार्गे विभागीय आयुक्तालयावर हा महामोर्चा काढण्यात येईल. शहराबाहेरून येणाºया मोर्चेकºयांसाठी नाश्ता, पाणी, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगसाठी सहा झोन करण्यात आले आहेत. महामोर्चाला राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर, प्रथम महिला जगद्गुरू डॉ. माते महादेवी यांच्यासह अनेक धर्मगुरू मार्गदर्शन करणार आहेत. महामोर्चानंतर विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात सभा होईल.
स्वतंत्र धर्माच्या मान्यतेसाठी लिंगायत समाजाचा एल्गार, औरंगाबादेत महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 2:17 PM