शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लायन्सतर्फे प्रत्येक शहरात मधुमेह दवाखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:40 AM

देशातील प्रत्येक शहरात मधुमेह दवाखाना सुरू करण्यात येईल, तसेच जॉगिंगपार्क बनविण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशात मधुमेहींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन लायन्स क्लबतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेण्यात येत आहे. येत्या काळात देशातील प्रत्येक शहरात मधुमेह दवाखाना सुरू करण्यात येईल, तसेच जॉगिंगपार्क बनविण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेश अग्रवाल यांनीदिली.नागरी सत्कार सोहळ्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी सांगितले की, मधुमेहावरील प्रायोगिक प्रकल्प नागपुरात सुरू करण्यात आला आहे. तेथे ३० लाख रुपये खर्च करून व्हॅन घेतली असून, त्याद्वारे गावोगावी जाऊन मधुमेहींची तपासणी केली जात आहे. तेथील यशस्वीतेनंतर टप्प्याटप्प्याने देशातील प्रत्येक शहरात मधुमेह दवाखाना, जॉगिंगपार्क आदी प्रकल्प सुरू करणार आहोत.१४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्त नवी दिल्ली येथून जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की, २१० देशांमध्ये लायन्स क्लबचे कार्य चालते. यात ५ प्रमुख प्रकल्पांवर आम्ही भर देत आहोत. नेत्ररोग, पुस्तक वाटप, पर्यावरण, मधुमेह व लहान मुलांच्या कर्करोगनिदानाच्या संशोधनावर मोठा खर्च करीत आहोत. याद्वारे आम्ही जगभरातील १७ कोटी गरजूंना विविध माध्यमांतून मदत केली आहे.सुमारे १ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. २०२० पर्यंत दरवर्षी जगातील २० कोटी गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचण्याचे उद्दिष्ट आम्ही ठरविले आहे. या कार्यात मोठ्या प्रमाणात युवाशक्तीला सहभागी करून घेण्यात येणार आहे. लायन्स क्लबमध्ये ५० टक्के महिला असाव्यात यासाठी आम्ही मोहीम हाती घेत आहोत. महिलांनाही समानता, अधिकार मिळावा, त्यांच्यातून नेतृत्वगुण तयार होऊन पुढे यावे, असा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी, पूर्वप्रांतपाल महावीर पाटणी यांची उपस्थिती होती.