लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लायन्स क्लब हे समाजकार्यात अग्रेसर असून, शेवटच्या घटकांपर्यंत मदतकार्य पोहोचविण्याची जिद्द प्रत्येक सदस्यात कायम रुजली पाहिजे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी केले.औरंगाबादेत १८ वर्षांनंतर लायन्स क्लब इंटरनॅशनल बहुप्रांतीय परिषद नुकतीच पार पडली. यावेळी ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल संदीप मालू, उपप्रांतपाल विवेक अभ्यंकर यांच्या टीमचा तसेच नवीन विविध अध्यक्षांचा पुष्प व प्रमाणपत्र देऊन शनिवारी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजेंद्र दर्डा म्हणाले की, बिंदुसरेचा पूर व लातूरच्या भूकंपात मदतीसाठी धाऊन जाणारे पहिले हात फक्त लायन्सचेच होते. नव्या पिढीला ही माहिती असावी.लायन्सची मुख्य मार्गदर्शक टीम तीच आहे. लायन्स क्लबच्या विविध शाखा तयार करण्यात येत आहेत. वर्षभर त्या व्यवस्थित चालतात काय, त्यांचे पदाधिकारी काम व्यवस्थित करतात की नाही, याचा लेखाजोखा ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकावर जबाबदारी टाका. समाजकार्यात लायन्सची जागतिक पातळीवर ओळख असून, प्रत्येकांनी समाजसेवेचे व्रत अंगी बाळगलेच पाहिजे, असेही दर्डा म्हणाले. नव्याने लायन्समध्ये येणाऱ्यांचा समारंभातून उत्साह वाढविण्याचे काम एमजेएफ एम. के. अग्रवाल यांनी सातत्याने केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण वाघमारे, संजीव गुप्ता यांनी केले तर आभार राजेश भारुका यांनी मानले.नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार...लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद-वाळूजचे अध्यक्ष अशोक जगधने, मिडटाऊन एनएक्सचे अध्यक्ष गौरव मालाणी, औरंगाबाद मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. सुशील भारुका, मेट्रोचे अध्यक्ष जयंत चौधरी, आयकॉनचे अध्यक्ष घनश्याम करणानी, जेमिनीचे अध्यक्ष विशाल झंवर, डेक्कनचे अध्यक्ष शामराव पाटील, क्लासिकचे अध्यक्ष संदीप डोडल, औरंगाबाद सिटीचे अध्यक्ष चेतन अग्रवाल, औरंगाबाद सिडकोचे अध्यक्ष महेंद्र खानापूरकर, एन्जलच्या अध्यक्षा हिना देसाई, लायन्स क्लब आॅफ औरंगाबादच्या अध्यक्षा छाया जंगले, औरंगाबाद- चिकलठाणा अध्यक्ष- सुरेश साकला आदींसह जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अॅड. शांतीलाल छापरवाल व अन्य पदाधिका-यांचा सत्कार केला.
लायन्सचे समाजकार्य शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याची जिद्द हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:15 AM