चौकट :
जिल्हा सामान्य रुग्णालयातही कोरोना वॉर्डमध्ये काहीकाळ रुग्णांसाठी शांत संगीत लावून ठेवले जात होते. काही काळ आजार विसरून रुग्णांना एकटेपणा जाणवू नये, असा उद्देशही त्यामागे होता.
प्रतिक्रिया :
१. संगीतातले वेगवेगळे प्रयोग पर्किंसन, अल्झायमर, विस्मरण या आजारांमध्ये प्रभावी उपाय ठरू शकतात. लॉकडाऊनकाळात विशेष मुलांना नियंत्रणात ठेवणे, त्यांच्या पालकांसाठी आव्हान होते. अशा मुलांना शांत करण्याचे, त्यांना त्यांचा आनंद मिळवून देण्याचे काम म्युझिक थेरपीने केले. विशेष मुले, वृद्ध व्यक्ती, मानसिकदृष्ट्या आजारी अशा सगळ्यांनाच संगीतोपचार उपयोगी ठरतो. मन हलके करण्याचे सामर्थ्य संगीताएवढे इतर कोणत्याही कलेत नाही.
- मंजूषा राऊत, म्युझिक थेरपिस्ट
२. कोविड रुग्णांनाही संगीतोपचार देणे, ही सध्याच्या काळातली अतिशय उत्तम कल्पना ठरू शकते. मानसिक आजारांना नियंत्रणात ठेवण्याचे काम संगीत करते, हे अनेक अभ्यासातूनही सिद्ध झाले आहे. आजार कमी स्वरूपाचा असल्यास केवळ संगीतोपचाराने आणि आजाराची तीव्रता जास्त असल्यास औषधांसोबतच संगीतोपचार केल्याने रुग्णाला नक्कीच फायदा होतो.
- डॉ. प्रसाद देशपांडे
मानसोपचारतज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय रुग्णालय