औरंगाबादेत आठवड्याच्या शेवटी कांद्याच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली, तसेच अन्य फळभाज्यांचे भावही वधारले; मात्र आवक अधिक असल्याने पालेभाज्या मातीमोल भावातच विकल्या जात आहेत.
अडत बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र कांद्याच्या मुबलकतेने भाव गडगडले आहेत. २०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत होता; मात्र कांदा-बटाटे उत्पादक शेतकºयांसाठी केंद्र सरकार लवकरच विशेष पॅकेज देण्याची तयारी करीत असल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने रविवारी कांद्याचे भाव वधारले.
५०० ते १ हजार रुपये प्रतिक्विंटलने कांदा विकला गेला, तसेच ९०० ते १००० रुपयांनी विक्री होणाºया हिरव्या मिरचीने १२०० ते २ हजार रुपयांपर्यंत मजल मारली. वांगे, पत्ताकोबी, भेंडीचे भावही वाढले. पालेभाज्या मात्र मातीमोल भावाने विक्री होत आहेत. मेथी दीडशे ते अडीचशे रुपये शेकडा विकली गेली.