लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकात धमाकेदार कामगिरी करणाºया सपोनि ओमकांत चिंचोलकर यांची स्थानिक गुन्हे शाखेत एन्ट्री झाल्यामुळे अनेकांची अस्वस्थता वाढली आहे़ चिंचोलकर यांनी गेल्या आठवडाभरात तब्बल आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख असताना दोन महिन्यांच्या काळात चिंचोलकर यांनी जिल्हाभरात अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करुन सोडले होते़ त्यात लोकप्रतिनिधींसोबत बिनसल्यानंतर विशेष पथकातून त्यांची उचलबागंडी करुन किनवट पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली़ त्यानंतर विशेष पथकाची हवाच निघून गेली़ दारुचे एक-दोन बॉक्स पकडण्यापुढे हे विशेष पथक उल्लेखनीय कामगिरी करण्यात अपयशीच ठरले होते़ त्यात स्थानिक गुन्हे शाखेचा कारभारही जेमतेमच सुरु होता़ स्थागुशात सध्या कर्मचाºयांची नवीन भरती असल्यामुळे मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यातही स्थागुशाला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते़ यावर जालीम उपाय शोधत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी सपोनि चिंचोलकर यांची स्थागुशात वर्णी लावली़स्थागुशात येताच चिंचोलकर यांनी पोलिसांशी अर्थपूर्ण संबंध असलेल्या रेती माफियांना टार्गेट करीत, तब्बल पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ त्याचबरोबर अवैध दारुविक्री करणाºयांना पकडले़ बुधवारी देगलूर नाका भागात ईलियास किराणा दुकानावर छापा मारुन लाखो रुपयांचा गुटखा पकडला़ गुटखा विक्री करणाºया आरोपीला पकडण्यात आले असून गुन्हा नोंद झाला आहे़अचानक सक्रिय झालेल्या स्थागुशाच्या कारवाईमुळे पोलीस दलातीलच अनेक जण अस्वस्थ झाले आहेत़ त्याबाबत पोलीस दलात कर्मचारी चवीने चर्चा करीत आहेत़
स्थानिक गुन्हे शाखा लागली कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:14 AM