शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

सलीम अली सरोवराच्या गेटचे कुलूप एमआयएमने तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 4:47 PM

खंडपीठाच्या आदेशानुसार मागील काही वर्षांपासून सलीम अली सरोवराला कुलूप लावण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी एमआयएमचे नगरसेवक नासेर सिद्दीकी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सरोवराचे गेट कटर लावून तोडले.

ठळक मुद्देनगरसेवक तथा मनपातील गटनेते नासेर सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर मंगळवारी सरोवराचे कुलूप उघडण्यात येणार असल्याची घोषणा केली. सायंकाळी कटर लावून सरोवराचे लोखंडी गेट चक्क कापण्यात आले.

औरंगाबाद : खंडपीठाच्या आदेशानुसार मागील काही वर्षांपासून सलीम अली सरोवराला कुलूप लावण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी एमआयएमचे नगरसेवक नासेर सिद्दीकी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सरोवराचे गेट कटर लावून तोडले. यानंतर त्यांनी बेकायदेशीरपणे सरोवरात प्रवेश केला. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले आहेत. एमआयएमच्या या बेकायदेशीर कृतीचा संपूर्ण अहवाल खंडपीठालाही सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

महापालिकेने पाच वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून सलीम अली सरोवराचा परिसर सुशोभित केला. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेश शुल्कही आकारण्यात येत होते. महापालिकेला महिना अडीच ते तीन लाख रुपये महसूल प्राप्त होत होता. सरोवरासाठी नेमलेल्या जैव विविधता समितीने मनपाच्या कामकाजावर आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतली. सरोवराचा संपूर्ण परिसर पक्ष्यांसाठी आहे. विदेशातून येथे पक्षी येतात. नागरिकांचा येथे राबता वाढल्यास पक्षी येणार नाहीत. मनपाने येथे केलेली मोडतोडही योग्य नसल्याचा दावा समितीने केला. न्यायालयाने याप्रकरणी स्थगिती आदेश दिले. तेव्हापासून सरोवराला कुलूप लावले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून समितीला विश्वासात घेऊन कुलूप उघडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी अनेकदा प्रयत्नही केले. मात्र त्याला यश आले नाही. 

मजलीस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे नगरसेवक तथा मनपातील गटनेते नासेर सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर मंगळवारी सरोवराचे कुलूप उघडण्यात येणार असल्याची घोषणा केली. सायंकाळी कटर लावून सरोवराचे लोखंडी गेट चक्क कापण्यात आले. गेट तोडून आत प्रवेश करीत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सरोवराच्या गेटजवळ फोटो सेशनही करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.  

त्वरित गेट बंद केलेएमआयएम नगरसेवक आणि कार्यकर्ते निघून गेल्यावर घटनेची माहिती मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी त्वरित सरोवराला कुलूप लावण्याचे आदेश दिले. बीओटी विभागाचे उपअभियंता शेख खमर यांना संबंधितांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आले.

एमआयएमचा निव्वळ स्टंटएमआयएम पक्षाची वाताहत मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्यांचा जनाधार आता संपत आला असून, मागील काही दिवसांपासून नगरसेवक निव्वळ स्टंट करण्यात मग्न आहेत. मनपावर उर्दूत बोर्ड लावणे, सभागृहात गोंधळ घालणे, भांडणे करणे, खुर्च्या भिरकावणे ही वृत्ती चांगली नाही. न्यायालयाचा आदरही हा पक्ष करीत नाही. सरोवराचे कुलूप तोडण्याचा प्रकार आम्हीसुद्धा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहोत. चित्रफीत न्यायालयात दाखविण्यात येईल. - नंदकुमार घोडेले, महापौर

न्यायालयाचा उघडपणे अवमानमागील चार वर्षांपासून सरोवर बंद आहे. सरोवराजवळ एक उद्यान नागरिकांसाठी खुले आहे. स्वामी विवेकानंद उद्यानही जवळ आहे. सरोवरातील ३०६ झाडे, येथे येणारे १३२ पक्षी टिकावेत म्हणून आम्ही न्यायालयात गेलो. शहरासाठी हे आॅक्सिन हब आहे. येथे पर्यटक नागरिक आल्यास सरोवराची वाट लागेल. मनपाने सरोवराचे रक्षण योग्य केले नाही. त्यामुळे नगरसेवकांनी कुलूप तोडले. न्यायालयाचा अवमान झाल्याचे आम्ही निदर्शनास आणून देणार आहोत.- डॉ. किशोर पाठक, पक्षीमित्र

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ