शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

Lockdown In Aurangabad : लॉकडाऊनसाठी ८० टक्के पोलीस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 8:30 PM

शहरातील जनतेने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केले

औरंगाबाद : शहरात दुसऱ्यांदा लागू झालेल्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शहर पोलीस दलातील ८० टक्के पोलीस रस्त्यावर उतरल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. शहरातील जनतेने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केल्यामुळे रस्त्यावर केवळ सरकारी अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांची वाहने होती. 

कोरोना विषाणूची साखळी तोडण्याचा  उद्देश डोळ्यासमोर ठेवून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आराखडा तयार केला. यानुसार शुक्रवारी पोलीस आयुक्त प्रसाद, उपायुक्त निकेश खाटमोडे, उपायुक्त मीना मकवाना, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, डॉ. हनुमंत भापकर, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त डॉ. दिनेश कोल्हे, रवींद्र साळोखे  यांच्यासह १७ पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, ३५० होमगार्ड, राज्य राखीव बलाच्या दोन कंपन्या, १५ स्ट्रायकिंग फोर्स पथक, सहा दंगा काबू पथक (आरसीपी) तैनात आहे. शहरातील ५० ठिकाणी फिक्स पॉइंट लावले आहेत. १८ जुलैपर्यंत शहरात पोलिसांचा असाच बंदोबस्त असेल, अशी माहिती उपायुक्त मीना मकवाना यांनी दिली. लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही शनिवारी पोलीस अधिक कडक कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत. 

प्रमुख रस्त्यावर चारचाकीतून, तर गल्लीत दुचाकी गस्तलॉकडाऊनसोबतच संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी मुख्य रस्त्यावर नाकाबंदी आणि चारचाकी वाहनातून गस्त सुरू केली आहे, तर कॉलन्यांमध्ये अंतर्गत गल्लीत दुचाकीवरून पोलीस गस्त घालत आहेत. 

पोलिसांच्या मदतीला मनपा कर्मचारीचौकाचौकांत नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांच्या मदतीला महापालिकेचे कर्मचारी तैनात केले आहेत. 

चौकात रस्त्याची एक बाजू बंद प्रत्येक चौकात पोलिसांनी रस्त्याची एक बाजू बंद केली. यामुळे वाहन तपासणी करणे पोलिसांना सोपे होत होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद